ताज्या घडामोडी

पुन्हा एकदा ५६ खेडी योजनेचा पाणी पुरवठा विस्कळीत

ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या तोंडावर आवर्तने लांबल्याने गृहिणीची उडाली तारांबळ..

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता.०५ गिरणा धरणावरील ५६ खेडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या उदभव विहिरीवरील शंभर अश्वशक्तीचा व्हीटी पंप जळाल्याने योजनेवरील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे पंप दुरुस्ती साठी दोन दिवसाचा कालावधी लागणार असल्याने ऐन दिवाळीच्या सणासुदीत पिण्याचे पाणी मिळणार नसल्याने पाण्यासाठी यातायात करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.
योजनेवरील वारंवार उदभवणाऱ्या गळत्यांमुळे अगोदरच ५६ खेडी नळयोजना विवादात सापडली आहे एरवी अधून मधून जलवाहिन्या वारंवार फुटत असतातच अशातच अगोदर उपसा करणाऱ्या व्ही टी पंपचे स्टार्टर जळाले त्यानंतर आज थेट व्हीटी पंप जळाल्याने तो कधी दुरुस्त होईल याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहे शहरालगत असलेल्या हनुमाननगर भागातील पाणी पुरवठा करण्यासाठी चे आवर्तन सुरु असताना अचानक जलवाहिनी फुटली तिच्या दुरुस्तीत तीन दिवस गेले त्यानंतर पाणी पुरवठा सुरु करण्याची वेळ येताच अचानक स्टार्टर जळाले आणि होणारा पाणी पुरवठा लांबणीवर पडला आज तो सुरु करत असताना धरणावरील उपसा करणारे व्हीटी पंप जळाला योजना कालबाह्य झाली व जलवाहिन्या जुन्या झाल्या अशा साचेबंद सबबी सांगून योजना सुरु असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत असते सध्या या योजनेचा उपसा करणाऱ्या तीन व्हीटी पंप पैकी एक पंप नादुरुस्त असून दोन पंप पैकी एक पंप जळून गेल्याने स्टॅण्डबाय साठी कुठलीही पर्यायी व्यवस्था कार्यान्वित नसल्याची झळ पाणीपुरवठ्याला बसून वितरण व्यवस्था विस्कळीत बनली आहे.
या योजनेला शाश्वत पर्याय म्हणून नव्या सुधारणेसह ७८ खेडी नळयोजनेला चालना मिळाली आहे त्यामुळे नवी योजना सुरु होत असल्याचेगृहीत धरून सध्या चालू स्थितीतील नळयोजनेचे मातेरे मात्र होऊ लागले आहे सध्या या योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी जिल्हा परिषदेला वर्षाकाठी येणारा खर्चाची तरतूद आहे मग या खर्चाचे फलित नेमके काय ? कमी अधिक पाण्याच्या दाबामुळे जलवाहिन्यातील सांधे उखडून त्या जलवाहिन्या नादुरुस्त होणे,त्याला गळती लागणे यात नावीन्य नसले तरी अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून त्याची डागडुजी करणे हा एक उपाय असतो ते निर्गक्रमप्राप्त असते मात्र वारंवार योजनेवरील व्हीटी पंप नादुरुस्त होणे जलवाहिन्या ठराविक अंतरात फुटणे, त्यातून लाखो लिटर पाणी वाया जाणे एअरव्हाल्व ला खुंट्या ठोकणे, असे एकूण निर्माण होणाऱ्या तांत्रिक दोषांची जबाबदारी कुणाची ? सहेतुक होत असलेल्या गळत्या रोखताना त्यावर पोलीस कारवाई करावी असा प्रयत्न व्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणेने कितीदा केला ? गळतीच्या परिणामावर मार्ग शोधावे तसे होत नाहीत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.