ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्याच्या मुद्यावर सलग चौथ्या दिवशीही राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत उपोषण सुरुच

दुष्काळप्रश्नी गावागावांतून तहसिल कार्यालयात पत्र पाठवा राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांचे आवाहन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता ५ राज्यसरकारने घोषित केलेल्या ४० दुष्काळाच्याग्रस्त तालुक्याच्या यादीत अन्यायकारक नांदगाव तालुक्याला वगळण्यात आल्याच्या मुद्दयांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )पक्षाच्या वतीने तालुकास्तरीय यंत्रणेकडून जोवर वस्तुस्थितीदर्शक माहिती मिळत नाही तोपर्यंत २ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेले बेमुदत उपोषण रविवारी सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे गेल्या तीन दिवसापासून कृषी,महसूल व तालुका पंचायत समिती स्तरावरून उपोषणार्थी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी उपस्थितीत केलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत असून काल शनिवारी सुटीचा दिवस असूनही कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी माहिती संकलित करण्याचे काम करीत होते.

तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाले यांनी शनिवारी नव्या तहसील बाहेर सुरु असलेल्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे व त्यांच्या आंदोलनकर्त्या सहकाऱ्यांची भेट घेत कृषी विभागाकडून सद्यस्थितीत दुष्काळासंबंधी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत माहिती दिली मात्र जोवर तालुक्याच्या दुष्काळावर प्रशासन माहिती पाठविताना कुठे मागे पडले व त्यातील राहून गेलेल्या त्रुटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत सध्या सुरु असलेल्या बेमुदत उपोषणपासून क्षणभरही मागे हटणार नसल्याबद्दल पक्षाचे कार्यकर्ते ठाम राहणार असल्याचे उपोषणकर्ते महेंद्र बोरसे यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले दरम्यान शनिवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या पक्ष संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपोषणार्थ्यांची गाठीभेटी घेतल्या त्यात मनमाड चे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे,अनिल जाधव नितीन जाधव वाल्मीक टिळेकर,देविदास उगले विजय पाटील योगिता पाटील,अशोक पाटील देवदत्त निकम बाळासाहेब देहाडराय विलास राजुळे सोपान पवार परसराम शिंदे अशोक शिंदे राजमल जाधव अशोक पवार यांचा समावेश होता
दरम्यान दुष्काळाची भिषण परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने तहसिलदार नांदगाव ह्यांचा नावे ग्राम पंचायतीच्या वतीने तहसिल कार्यालयात परस्पर पत्र देऊन विषयाचे गांभीर्य लक्षात आणून द्यावे,असे आवाहन सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्यावतीने कऱण्यात आले करण्यात आले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.