ताज्या घडामोडी

आमदार सुहास आण्णा कांदेंकडून तृतीयपंथीयांचा सन्मान..

ढोल-ताशांच्या गजरात स्वागत; दीपावलीनिमित्त पैठणीची भेट

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता. ६ : किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री श्री पायलगिरी गुरू, महामंडलेश्वर नंदगिरी यांच्यासह शहर आणि मनमाड येथील तृतीयपंथीयांनी आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता आमदार सुहास आण्णा कांदे. व सौ अंजुमताई कांदे यांनी सर्व तृतीयपंथीयांचा यथोचित सत्कार केला.

दीपावली पर्वाचा प्रारंभ सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अंजूमताई कांदे यांच्या संकल्पनेतून रविवारी आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी नांदगाव आणि मनमाड शहरासह जिल्ह्यातील तृतीयपंथी यांना पाचारण करण्यात आले होते.हनुमाननगर येथील आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या निवास्थानापर्यंत आलेल्या सर्व तृतीयपंथी यांचे ढोलताशाच्या पुरो गजरात गुलाबाची फुले उधळीत या विशेष अतिथीचे स्वागतही जोरदार स्वागत करण्यात आले

पुरोहितांच्या मंत्रोच्चारात आमदार सुहास आण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री पायलगिरी गुरू, महामंडलेश्वर नंदगिरी, मुस्कान गुरू,नीतू हाजी गुरू, अणेश गुरू, श्रावणी पायल नंदगिरी आदींचे पाद्यपूजा करीत आशीर्वाद घेतले.

तत्पूर्वी आलेल्या तृतीयपंथी यांच्या हातावर मेंदी काढून हिरव्या रंगाच्या बांगड्या देत त्यांचा यथोचित साजशृंगार करीत गुलाबी रंगाचे फेटे बांधण्यात आले. महापूजेनंतर सर्वांना मिष्टान्न भोजन देत दिवाळी भेट म्हणून पैठणी आणि गिफ्ट बॉक्स तसेच ओवाळणी भेट दिली.

प्रतिक्रिया…

आमच्यासारख्या समाजातील दुर्लक्षित घटकांची खणा-नारळाची ओटी भरून आम्हा तृतीयपंथीयांचा हिऱ्यासारख्या भावाने सन्मानाच्या कोंदणात बसवून आम्हाला उपकृत केले.आमच्या नशिबी केवळ टिंगलटवाळी येत असते,मात्र,आमच्यासारख्या वंचित घटकातील किन्नरही माणसं आहेत,हे अंजूमताईनी हेरून आम्हाला सन्मानित करण्यात जो पुढाकार घेऊन दिवाळीचा सण गोड केला व त्याने आम्ही भारावलो आहोत.

– महामंडलेश्वर श्री श्री पायलगिरी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.