ताज्या घडामोडी

भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिकच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी आकाश कंदील व रांगोळी स्पर्धाचे आयोजन

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नाशिक ता.०६ बळीराजा गौरव दिन -२०२३ निमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिकच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी आकाश कंदील व रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आले असून यात तमाम शेतकरी -शोषित-कष्टकऱ्यांचा आदर्श असलेल्या बळीराजाला अभिवादन करण्यासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी आकाश कंदील व रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आले आहोत.

अ) आकाश कंदील स्पर्धा सहभाग शुल्क नाही आपल्याला शक्य होईल त्या आकारात आकाश कंदील बनवावा.त्यावर “ईडा पीडा टळो-बळीराज्य येवो” असे घोषवाक्य टाकावे.गुगलवरुन बळीराजाचे चित्र मिळवून ते टाकावे.याव्यतिरिक्त वेगळेपण आणण्यासाठी आणखी घोषवाक्य,वेगळी डिझाईन्स अथवा आणखी काही सजावट तुम्ही करु शकता.
स्पर्धेला वयोगट नाही.आकाश कंदील बनवल्यावर त्याचा फोटो काढून संयोजकांकडे ९४२११७६४८५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर दिनांक १० नोव्हेंबर पर्यंत पाठवावा. त्यानंतर त्यातील उत्कृष्ट व आशयपूर्ण कलाकृतीला निरीक्षक भेट देतील व‌ बलिप्रतिपदेच्या दिवशी पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल.

पारितोषिक पुढीलप्रमाणे असतील:
प्रथम – ₹३०००/-
द्वितीय – ₹२०००/-
तृतीय – ₹१०००/-
सहभागी सर्वांना सहभागीता प्रमाणपत्र देण्यात येईल.

————————————–

ब) रांगोळी स्पर्धा
या स्पर्धेत भाग घेण्याकरिता दिनांक १० नोव्हेंबर पर्यंत ९४२११७६४८५ या नंबरवर फोन करून सहभागिता कळवावी.वरीलप्रमाणे “ईडा पिडा टळो- बळीराजा येवो” हे घोषवाक्य आवश्यक त्याव्यतिरिक्त बळीराजाचे चित्र जमेल तसे रेखाटण्याचा प्रयत्न करा किंवा इतर डिझाईन्स तयार करावे.सहभाग नोंदवलेल्या नागरिकांनी रांगोळीचा फोटो काढून ९४२११७६४८५ या क्रमांकावर बलिप्रतिपदेच्या दिवशी किंवा त्याआधी पाठवावे. त्यातील उत्कृष्ट व आशयपूर्ण कलाकृतीला निरीक्षक भेट देतील व पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतील.स्पर्धेसाठी वयोगट नाही.
पारितोषिक पुढीलप्रमाणे असतील:
प्रथम – ₹३०००/-
द्वितीय – ₹२०००/-
तृतीय – ₹१०००/-
सहभागी सर्वांना सहभागीता प्रमाणपत्र देण्यात येईल.असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव कॉ.राजू देसले,नाशिक जिल्हा सचिव कॉ.महादेव खुडे,नाशिक सचिव तलहा शेख,कॉ.दत्तु तुपे, विराज देवांग,आदींनी केले आहे.माहिती साठी संपर्क:तल्हा शेख,शहरसचिव,भाकप नाशिक मोबा: ९४२११७६४८५

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.