नांदगाव तालुक्यात सिमेंट बंधाऱ्यात पडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू
चिंचविहर गावात ऐन दिवाळी सणावर विर्जन
गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा
नांदगाव ता.०९ कपडे धुण्यासाठी परिसरातील सिमेंट बंधाऱ्यावर गेलेल्या दोन मुलींचा बंधाऱ्यातून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून.तर एक मुलीला वाचविण्यात नागरिकांना यश आले.चिंचविहीर (ता.नांदगाव) येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.चिंचविहीर गावातील तांड्यावरच्या काही मुली कपडे धुण्यासाठी दुपारी गावातल्या सिमेंट प्लग बंधाऱ्याकडे गेल्या होत्या.यात नववीमध्ये शिकणारी पूजा अशोक जाधव व खुशी देवीदास भालेकर आणि कावेरी या कपडे धुताना पाय घसरल्याने बंधाऱ्यातील पाण्यात पडल्या.मुली पाण्यात पडल्याचे कळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी पाण्यात उडी मारत तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र पूजा आणि खुशी खोल पाण्यात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला,तर कावेरीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.कावेरी हिस पुढील उपचारासाठी तत्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले.एकमेकींना वाचविण्यात या तिघी पाण्यात असाव्यात आणि यात दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी नांदगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.