महाराष्ट्र

नांदगाव तालुक्यातील प्रभाव क्षेत्रांना वगळल्याने चर्चेला उधाण..

नांदगाव ता.०११ नांदगाव तालुका दुष्काळग्रस्तच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या मंडळनिहाय दुष्काळसदृशतेच्या यादीतून, बाणेश्वर, नागेश्वर, व शनेश्वर या प्रभाव क्षेत्रांना डावलण्यात आल्याची भावना स्थानिक सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

तो चर्चेचा विषय बनला आहे.बाणेश्वर म्हणजे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे बाणगाव मंडळ,शनेश्वर म्हणजे माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांचे न्यायडोंगरी मंडळ,नागेश्वर म्हणजे माजी आमदार संजय पवार यांचे मंडळ तर.तालुक्यातील आठपैकी पाच मंडळात दुष्काळसदृश्यता जाहीर झाली, मात्र राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या तिघाही मंडळांना वगळण्यात आल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.माजी आमदार अँड.अनिल आहेर हे सरकारविरोधी महाविकास आघाडीत तर अलीकडेच माजी आमदार संजय पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर साथ सोडली व ते आमदार सुहास कांदे याना जॉईन झाले. ज्येष्ठ नेते कवडे हे गेल्या दहा वर्षपासून आमदार सुहास कांदे यांचे मार्गदर्शक नेते म्हणून सोबत आहेत.आहेरांच्या प्रभाव क्षेत्रातली गावे वगळण्यात आली.विरोधक म्हणून तसे घडले असण्याची समजूत एकवेळ समजून घेण्यासारखी असली तरी सत्तेत असलेल्या जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे,माजी आमदार संजय पवार यांच्या मंडळातील गावांना दुष्काळाची झळ बसूनही त्यांच्या प्रभावक्षेत्राखालील गावांचा अंतर्भाव नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत झाला नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. एरवी राजकीय घडामोडीत निर्णयकी राहणाऱ्या बाणेश्वर,शनेश्वर,नागेश्वर पट्ट्याला दुष्काळसदृश्यतेच्या यादीतही समावेश होऊ न शकल्याने प्रशासकीय तांत्रिक अडचणी देत स्पष्टीकरण करण्यात येत असले तरी ही राजकीय कोंडी करण्याचा तर हा हेतू तर नसावा ना अशा उलटसुलट चर्चेमुळे तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. नेत्यांची कोंडी करण्यासाठी दुष्काळ ही सुटला नाही ? यामागे कुणाचे षडयंत्र आहे अशी चर्चा दबक्या आवाजात तालुक्यात सुरु आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.