महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाला, सुरुवात.

दुष्काळी भागात अवकाळी पाऊसामुळे मिळणार जीवदान

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगांव ता.२६ हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,आज उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तर धुळे, नंदुरबार,जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे होता यानुसार आज नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यात अवकाळी पावसाचा सुरुवात झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड,सिन्नर,नांदगांव,मनमाड.काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपिटीची पाऊस पडत आहे.हा पाऊस दुष्काळग्रस्त भागात जीवदान ठरणार आहे तर काही ठिकाणी रब्बीतील ज्वारी,हरबरा पिकांना वरदान ठरण्याची शक्यता आहे.आवकळी का होईना पण हा पाऊस जोरदार व्हावा अशी आस बळीराजा लावून आहे


SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.