ताज्या घडामोडी

आवकळी व गारपीटग्रस्त नुकसानीची पाहणी.. करण्यासाठी आमदार सुहासआण्णा कांदे थेट बांधावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच भेट घेऊन तालुक्यातील नुकसानीची परिस्थिती अवगत करून तात्काळ नुकसान भरपाई मंजूर करून घेणार :- आमदार सुहास आण्णा कांदे

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.०२७ नांदगांव तालुक्याला रविवारी आवकळी व गारपिटी चा तडाखा बसल्याने तालुक्यातील बळीराजाच्या शेतमाल उध्वस्त झाला असून आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सोमवारी जोंधळवाडी शास्त्रीनगर व धोटाने या परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट शेताच्या बांधावर जात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व कुटुंबीयांना भेट दित त्यांच्याशी संवाद साधला नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली,व त्यांचे सांत्वन केले,

आम्ही तुमच्या सोबत आहोत,नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश मी तहसीलदार,यांना दिले असून पंचनामे सुरू आहे,तूम्ही काळजी करू नका,आजच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना तालुक्यातील नुकसानीची परिस्थिती सांगून तात्काळ नुकसान भरपाई मंजूर करून घेणार असल्याचे तालुक्यातील शेतकरी बांधवांना आश्वासन दिले,

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी करते वेळी समवेत प्रांतधिकारी श्री बाबासाहेब गाढवे ,तहसीलदार सिद्धार्थ मोरे, सहायक गटविकास अधिकारी संदीप दळवी ,संबंधित गावाचे,ग्रामसेवक, तलाठी .केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे स्वीय सचिव प्रवीण रौंदळ यासह शिवसेना पदाधिकारी,भाजपा पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.