ताज्या घडामोडी

गारपीट,वादळी वाऱ्यासह, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी : मंत्री डॉ भारतीताई पवार

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.२७ नाशिक जिल्ह्यात रविवारी ता२६ रोजी दिंडोरी,निफाड,मनमाड,नांदगांव,चांदवड व येवला तालुक्यामध्ये वादळी वा-यासह आवकळी पाऊस व गारपीट झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील प्रामुख्याने द्राक्षबागा,फळबागा तसेच टमाटे,कांदारोपे,गहू, हरबरा,ऊस,भातपिक,भाजीपाला इत्यादी पिके अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी या आसमानी संकटात धीर धरावा व घाबरून जाऊ नये नुकसान ग्रस्तांना शासन स्तरावरून या नैसर्गिक आपत्तीने झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत तसेच नुकसानग्रस्त विमाधारक शेतक-यांना विमा कंपन्यांकडुन तात्काळ पिकविमा मिळणेबाबत दिंडोरी लोकसभा खासदार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा. भारती प्रविण पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.