ताज्या घडामोडी

नांदगाव पोलिस ठाण्याला आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निधीतून ४ संगणक, प्रिंटर

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.०९ नांदगाव पोलीस ठाण्याला आमदार सुहास कांदे यांच्या आमदार निधीतून चार संगणक सेट व दोन प्रिंटर समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते देण्यात आले.

शहरातील वाढते नागरीकरण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने पोलिसांना कसरत करावी लागते.गुन्हेगारांची माहिती तपास करणे,माहिती अद्ययावत ठेवणे संगणकीकरणाच्या मदतीने सहज शक्य झाले आहे.या अनुषंगाने नांदगाव पोलीस ठाण्याने संगणक व प्रिंटर सेटची मागणी केली होती

.यानुसार आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निधीतून चार संगणक सेट व दोन प्रिंटर समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख उज्वला खाडे,मनमाड शहरप्रमुख संगीता बागूल,पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सागर हिरे,शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव, भाऊराव बागूल, शशी सोनवणे, गुलाब चव्हाण, भय्या पगार,संजय महाजन, संदीप सूर्यवंशी, बापूसाहेब जाधव, भरत पाटील, गौरव बोरसे,धनराज अग्रवाल, अरबाज बेग तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते

फोटो ओळ
नांदगांव येथे – पोलिस ठाण्यात आमदार सुहास आण्णा कांदे निधीतून ४ संगणक,प्रिंटर समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते स्वीकारताना पोलिस निरीक्षक प्रितम चोधरी,शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख उज्वला खाडे,मनमाड शहरप्रमुख संगीता बागूल,पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,समवेत सागर हिरे,शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव,आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.