ताज्या घडामोडी

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली उद्या चांदवडला आंदोलन

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.१० केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातमूल्यात वाढ केल्यावर आता कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.कांदा निर्यातबंदीच्या विरोधात येत्या सोमवारी (ता. ११) सकाळी साडेदहाला चांदवड येथील चौफुलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन होणार आहे. आंदोलनात नांदगांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )नांदगांव तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या किसान सेलचे अध्यक्ष निलेश चव्हाण,यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे प्रचंड संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.निर्यातबंदी विरोधात जिल्ह्यात शेतकरी वर्ग संतप्त झाला असून,जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत.यातच, शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. ११) चांदवड येथे आंदोलन होईल.शरद पवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.सोमवारी (ता.११ ) ला चांदवड येथील मुंबई- आग्रा रोड चौफुलीवर सकाळी साडेदहाला आंदोलन होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.