ताज्या घडामोडी

भवरी विकास सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी.लक्ष्मण चांगदेव हिरे यांची बिनविरोध निवड

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.०१६ तालुक्यातील भवरी विकास सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी.लक्ष्मण चांगदेव हिरे यांची बिनविरोध निवड झाली

भवरी विकास सेवा सहकारी सोसायटी माजी अध्यक्ष बाबासाहेब कौतिक भिलोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी.एस.बी ओरादकर,सहकार अधिकारी श्रेणी-२,यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी,(ता २२ रोजी) दुपारी १२ वाजता सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,नांदगाव कार्यालयात आयोजित करण्यात आलेली होती.अध्यक्ष पदासाठी लक्ष्मण हिरे यांचा ऐकमेव अर्ज सादर झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्षपदी लक्ष्मण हिरे यांच्या निवडीची घोषणा केली. नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण हिरे यांचे जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अभिनंदन केले यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिलोरे,उपाध्यक्ष नामदेव दाभाडे पदअधिकारी विलास गायकवाड,कैलास गायकवाड,बाबासाहेब भिलोरे,तुकाराम गायकवाड,अनिल ठाकरे,कांताबाई गायकवाड,सागर हिरे,मच्छिंद्र हिरे आदी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.