ताज्या घडामोडी

वखारी येथील दारू भट्टीवर पोलिसांची धडक कारवाई

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता. १६ : नांदगांव तालुक्यातील वखारी येथे पाटकिनारी अवैधरीत्या चालविणाऱ्या दारू भट्टीवर नांदगांव पोलिसांनी धडक कारवाई केली.

नांदगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना मिळालेल्या,गुप्त माहिती नुसार वाखारी येथील भिमराव तुकाराम सोनवणे हा गावठी दारु पाडण्याचे काम करतो आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती .याबाबत शहानिशा करत पोलिस निरिक्षक प्रितम चौधरी यांनी धडक कारवाईचा निर्णय घेत या ठिकाणी छापा मारला.या कारवाई मध्ये मुद्दे माल तीस हजार पाचशे रुपये किमंतीचा दहा प्लास्टिक ट्रम हात भट्टी साठी लागणारे साहित्य नवसागर रसायन युक्त मिश्रण वस्तू ताब्यात घेत वाखारी येथील दारू विक्रेता भिमराव तुकाराम सोनवणे यास रंगेहाथ अटक केली पोलीस कॉन्स्टेबल दिपक मुढे यांच्या फिर्यादी नुसार नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 582/2023 महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम कलम 65( ख)प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे


असुन या धडक कार्यवाही मुळे नांदगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक नंदु चव्हाण करत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.