ताज्या घडामोडी

जातेगांवला श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशाचे भव्य स्वागत

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

अरुण हिंगमिरे

नांदगाव ता.१७ तालुक्यातील जातेगांवला रविवार (ता..१७) रोजी सायंकाळी पाच वाजता अयोध्या येथील प्रभु श्रीराम,लक्ष्मण आणि माता सिता यांच्या जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात गावा-गावांत अयोध्या येथून अभिमंत्रित होवून आलेल्या अक्षदा कलशाचे आगमन झाले. यावेळी येथील सर्व ग्रामस्थांनी अक्षदा कलशाचे डिजे वाद्यावर भक्ती गीते लावून सियापती रामचंद्र की जय, जय श्री राम च्या घोषणा देत आतिषबाजी करत भव्य मिरवणुक काढून स्वागत केले.

यावेळी मिरवणूकच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते गावातील सर्व महिलांनी अक्षदा कलशाचे औक्षण करून दर्शन घेतले व मिरवणूकीमध्ये सहभागी झाल्या होत्या.या मिरणूकीची सांगता येथील श्री राम मंदिरात अक्षदा कलशाचे पुजन करून आरती करून प्रसाद वितरण करुन करण्यात आली. याप्रसंगी श्री राम मंदिर तरुण भक्त मंडळ यांनी दिलेल्या माहितीनुसार घाटमाथ्यावरील रोहिले,गोंडेगाव,जवळकी,बोलठाण,लोढरे, ठाकरवाडी,जातेगांव,वतंतनगर १ आणि २ चंदनपुरी, ढेकु खु व बु, कुसूमतेल,कासारी,इंदिरानगर,पोही,कसाबखेडा,माणिकपूंज,आणि जळगाव इत्यादी गावातील नागरिकांना अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी जातेगांव येथे मध्यवर्ती ठिकाणी अक्षदा कलश ठेवण्यात आला असून सात दिवसांनी रविवारी ता.२४ डिसेंबर रोजी कलशाची भव्य दिमाखात रथातून भजनाच्या निनादात व वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन शोभा वाढवावी असे श्रीराम भक्त मंडळ आणि ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.