ताज्या घडामोडी

बोलठाण येथे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल विज्ञान प्रदर्शनास उदंड प्रतिसाद

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

अरुण हिंगमिरे जातेगांव (नांदगाव )

नांदगाव :ता २० तालुक्यातील बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी नहार,सचिव सुरेंद्रजी नहाटा व महावीरजी नहाटा, देवेंद्रजी नहार आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले

व बोलठाण येथील के.सी.नहार पतसंस्थेचे चेअरमन- अमितजी नहार व संचालक मंडळ व गावातील या प्रसंगी गावातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रदर्शनात एकूण- 175 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आरोग्य , पर्यावरण,प्रदूषणय,जीवन,शेती,आधुनिक तंत्रज्ञान,अक्षय ऊर्जा,चंद्रायान दळणवळण,संगणकीय विचार या विषयांवर प्रकल्प सादर करण्यात आले होते.

या विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक -श्री शेलार पर्यवेक्षक-श्री बोरसे व ज्येष्ठ शिक्षक श्री साबळे,विज्ञान छंद मंडळाचे अध्यक्ष- श्रीमती जगताप उपाध्यक्ष श्री ठाकरे व सर्व विज्ञान मंडळाचे सदस्य तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू-भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी पालक व नागरिकांनी विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.