ताज्या घडामोडी

विज्ञान प्रदर्शन विध्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे : अमित बोरसे – पाटील

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव :ता.२० – विज्ञान प्रदर्शन विध्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे असून शिक्षकांनी त्यांच्यातील कल्पनाशक्ती व संशोधक वृत्तीला चालना देऊन भविष्यातील संशोधक तयार करावेत असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांनी केले ते न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात आयोजित ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते

अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संदीप दळवी होते.विद्यार्थ्यांनी निसर्गात घडणाऱ्या नवीन घटनांचे निरीक्षण करून पालक व शक्षकांना प्रश्न विचारून जिज्ञासू वृत्ती जोपासावी.विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी केले.व्यासपीठावर गटविकास अधिकारी संदीप दळवी,म.वि.प्र संचालक अमित बोरसे, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे,शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती नंदा ठोके,न पा प्रशासन अधिकारी एन.एम.चंद्रमोरे,जिल्हा विज्ञान अध्यापक संघ कार्यवाहक अरुण पवार,स्कूल कमिटी अध्यक्ष दिलीप पाटील,विजय काकळीज,राजाराम गवांदे,मुख्याध्यापक डी.व्ही.गोटे,मुख्याध्यापक डी.वाय.चव्हाण मुख्याध्यापिका श्रीमती.जे.आर काळे,श्रीमती.एस.एस कांबळे,श्रीमती एस.आर बोरसे मुख्याध्यापक योगेश पाटील,जी ए.वैद्य,पी.एन.खुटे,
आयोजक अविनाश शेवाळे,सी.डी.अहिरे,उमेश पाटील,निलेश इप्पर,
सुनील कोठावदे,भाऊसाहेब सोनवणे,अजित पगार,आत्माराम बोरसे,बाबूलाल ठोंबरे,प्रवीण ठोंबरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष संजय बच्छाव यांनी केले.
माध्यमिक गटात ४६,प्राथमिक गटात २८ व शिक्षक गटात १८ प्रकल्पांनी सहभाग नोंदविला.सूत्रसंचालन प्रकाश फणसे यांनी केले.आभार अशोक मार्कंड यांनी मानले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.