ताज्या घडामोडी

अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नाशिक ता.२१ कर्तव्यावरून घरी जाताना येथील वडनेर रोड परिसरात असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या गाडीचा धक्का लागल्याने देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचा अपघात झाला.

त्यांना लष्करी जवानांनी उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती मिळत आहे.मयत सोनवने यांचे पश्चात पत्नी,2 मुले असून ते 2 महिन्यापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला बदलून आले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण पोलिस स्टेशन तसेच देवळाली मधील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.