ताज्या घडामोडी

जातेगावला जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

अरुण हिंगमिरे
जातेगांव ता.२२ नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डी.वाय.चव्हाण अध्यक्षस्थानी होते.

थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यालयातील गणित शिक्षक एस.एम.मराठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकात त्यांनी गणिताचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले,तसेच थोर भारतीय गणितज्ञ रामानुजन यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय गणितज्ञ रामानुजन,आर्यभट्ट,भास्कराचार्य यांच्या कार्याविषयीची माहिती आपल्या भाषणातून मांडली.त्यानंतर गणित दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा गणिताविषयीचे विविध चार्ट निर्मिती स्पर्धा घेण्यात आली

तसेच राष्ट्रीय गणित दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते.विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व विविध गणितीय चार्ट तसेच भौमितिक आकृत्या वापरून चित्रे काढली होती.त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी विविध भौमितिक रचना व आकृत्या रांगोळीच्या साह्याने काढल्या होत्या.विद्यालयाचे प्राचार्य श्री चव्हाण व शिक्षकांनी या विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व गणित विषयाचे आणि इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. एस.एम.मराठे यांनी सर्वांचे आभार मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.