ताज्या घडामोडी

अतिरिक्त वाहतूकीमुळे बोलठाण रस्त्याची चाळण

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

अरुण हिंगमिरे

नांदगांव ता.२२ कन्नड तालुक्यातील औट्रम घाट जड वाहतूकीसाठी ११ ऑगस्ट पासून बंद केल्या पासून वैजापूर तालुक्यातील लोणी – तलवाडा ते नांदगाव तालुक्यातील कासारी मार्गे या रस्त्यावर वाहतूकीचा अतिरिक्त भार पडल्याने तसेच आगोदरच या रस्त्यावर तलवाडा घाटात मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने दररोज अनेक वाहने नादुरुस्त होवून रस्त्यावर उभे राहत असलेल्याने अनेक अवजड वाहनधारक आता कन्नड तालुक्यातील पानपोही फाटा ते मनेगाव मार्गे बोलठाण जातेगांव या रस्त्याने कासारी किंवा न्यायडोगरी जात आहेत.त्यामुळे नांदगाव तालुक्यातील पुर्व भागातील रस्त्यांची चाळण होत आहे.

या अठवड्यात दिवसभरात अशा अवजड वाहनाची संख्या सुमारे तीनशे पेक्षा अधिक झाली असून अगोदरच बोलठाण येथील उपबाजार समिती मध्ये दररोज कांदा,मका व धान्य घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या सातशे पेक्षा अधिक असून मानव विकास मिशनच्या व चाळीसगाव,वैजापूर आणि नांदगाव आगाराच्या बस इत्यादी वाहनांची वर्दळ वाढली आहे.हा रस्ता काही ठिकाणी हा रस्ता नऊ फुट रुंदीचा असल्याने दोन अवजड वाहने समोरासमोर आल्यावर वाहतूक जाम होत आहे.अगोदरच कमकुवत असलेला हा रस्ता आणि त्यावर अचानक वाढलेली वाहनांची वर्दळ त्यामुळे खारी- खामगाव – बोलठाण – जातेगाव- कासारी तसेच ढेकू ते न्यायडोगरी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडण्यास सुरुवात झालेली असून लवकरात लवकर या रस्त्यावरच्या वाढत्या वाहतुकीचे सर्वेक्षण करून हा रस्ता मजबूत आणि रुंद रस्ता तयार करण्यात यावा तसेच या मार्गावरील सर्व गावांजवळ रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविण्यात यावे या रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहनांची रहदारी वाढल्याने या परिसरात ढेकू – जातेगाव – बोलठाण रस्त्यावर प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रस्त्याच्या बाजूलाच असल्याने सकाळ व सायंकाळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावरन जात असतात या रस्त्यावर ठिक -ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे असून रस्त्याची डागडुजी करनेही गरजेचे आहे,या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना आपला शेती माल विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.