ताज्या घडामोडी

लिटल स्टार व रेंबो इंटरनॅशनल स्कुलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.२४ : नमन शैक्षणिक संस्था संचालित लिटल स्टार इंग्लिश स्कुल व रेंबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये क्रिसमस डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्षा सरिता बागुल प्रमुख उपस्थितीत होते

सदर कार्यक्रमात स्कुलमधील शिक्षक सांता -क्लाज च्या वेष – भुषा धारण करून लहान मुलांचे मनोरंजन केले त्यांचे मन हिरावून गेले होते.शाळेतील चिमुकल्यांनी सांताक्लॉजचा पोषाख परिधान करून ख्रिसमस (नाताळ) झिंगल बेलच्या तालावर नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद लुटला.समुह नृत्य,शब्दकोडे स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला तसेच विद्यार्थ्यांनी बालगिते गाऊन सर्वांनी मने जिंकली व अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषण कौशल्यांनी विविध नेत्यांची माहिती देऊनउपस्थितांच्या मनावर छाप पाडली.तसेच विद्यार्थ्यांनी विविध वेशभुषा परिधान करून फॅशन शो मध्ये सहभाग नोंदविला यावेळी कला शिक्षक यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सुदर क्रिसमस ट्री बनवून देखवा सादर केला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्षा सरिता बागुल रेंबो इंटरनॅशनल स्कुलच्या प्रिन्सिपल स्मिता सूर्यवंशी लिटल स्कुल च्या प्रिन्सिपल अनुराधा खांडेकर यांनी सर्वांना क्रिसमस डे च्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ
नांदगांव – येथील लिटल स्टार व रेंबो इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करताना चिमुकले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.