ताज्या घडामोडी

बाणगाव बुद्रुकच्या पोलीस पाटीलपदी सागर बागुल यांची निवड

स्पर्धा परीक्षेमधून झाली निवड : गावाच्या वतीने नागरी सत्कार

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता .२४ तालुक्यातील बाणगाव बुद्रुक येथील पोलिस पाटील पदाची जागा काही वर्षां पासून रिक्त होती शासनाने दिलेल्या पद भरती जाहीराती नुसार हे पद सर्व अनुसुचित जाती करीता राखीव होते.त्यानुसार जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात आली होती.त्यात अव्वल स्थान मिळवून सागर बागुल यांची बाणगाव बुद्रुक गावचे पोलीस पाटील म्हणून नियुक्ती जाहीर झाली.ही नियुक्ती येवला उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केली आहे.

बाणगाव बुद्रुक च्या पोलीस पाटील पदाच्याचे आरक्षण अनुसूचित जाती करिता राखीव निघाले होते या पदाची लेखी परिक्षा होऊन २१ डिसेंबर ला पात्र उमेदवार यांची मुलाखत घेण्यात आली यात बाणगाव बुद्रुक येथील श्री.सागर म्हसू बागुल यांना ४९ गुण मिळवून निवड करण्यात आले.सागर हा पदवीधर असून त्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून सागर हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे अखेर सागर च्या मेहनतीला यश मिळवून गावाच्या प्रतिष्ठच्या पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल सर्विकडे कॊतुक होत आहे,गावच्या ग्रामसभेत सागर याचे जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांनी शाल फुल गुच्छ देत सत्कार केला यावेळी व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले

प्रतिक्रिया…
गावच्या पोलीस पाटील पदावर काम करण्याची संधी मिळाली यात मनस्वी आनंद आहे,निवडी साठी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले,या पदावर काम करताना सर्वांना न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील..
सागर बागुल – नवनिर्वाचित पोलीस पाटील बाणगाव बुद्रुक

फोटो ओळ
१) नवनिर्वाचित पोलीस पाटील सागर बागुल यांचा ग्रामसभेत अभिनंदन करत नागरी सत्कार करताना जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे, समवेत सरपंच संगीता बागुल,माजी उपसरपंच,नारायण कवडे, सुनील कवडे,गणेश देवकर आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.