ताज्या घडामोडी

जातेगांवला अक्षदा मंगल कलशाची भव्य शोभायात्रा

श्रीराम माता सिता व लक्ष्मण यांची वेशभूषा विशेष आकर्षण

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

अरुण हिंगमिरे
नांदगाव ता.२४ तालुक्यातील जातेगांव येथे रविवार ता.२४ रोजी सकाळी साडेआठ वाजता श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेला अक्षदा मंगल कलशांची येथील श्रीराम मंदिरापासून डिजे वाद्यावर भक्ती गीते लावून सियापती रामचंद्र की जय,श्री राम जयराम जय राम,सियापती रामचंद्र की जय च्या घोषणा देत,प्रचंड आतिषबाजी करत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.

तर गावातील सर्व हिंदू नागरिकांनी आपल्या घरावर गुढी उभारली होती.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री विठ्ठल रखुमाई चौकात श्री राम मंदिर इत्यादी ठिकाणी जेसीबी मधून शोभायात्रेत सहभागी झालेल्या भक्तांवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती.या प्रसंगी राजदेहरे येथील ह.भ.प.स्वामी रामप्रकाशानंद गिरीजी महाराज,जळगाव बु येथील बाळकृष्ण महाराज बुरकूल,गोंडेगाव येथील,संपूर्णानंद सरस्वती महाराज व तुकाराम महाराज,कपिलनाथ आश्रम ढेकु येथील कामेश्वर महाराज,आणि श्री पिनाकेश्वर देवस्थान येथील माळी बाबा,एकनाथ महाराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते जातेगांव पंचक्रोशीतील जळगाव खु|, पोही,मानिकपूंज,कसाबखेडा,कासारी,कुसूमतेल,ढेकु खु व बुद्रुक, जातेगांव,चंदनपुरी,वसंतनगर एक व दोन,लोढरे ठाकरवाडी बोलठाण जवळकी गोंडेगाव रोहिले इत्यादी गावातील अक्षदा कलशाची ट्रॅक्टर सजवून ट्राॅलीमध्ये ठेवण्यात आलेल्या भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी तर लहान मुलांनी श्रीराम माता सिता व लक्ष्मण यांची साकारलेली वेशभूषा आणि मच्छिंद्र पवार या तरुणाने हनुमानाची वेशभूषा करून मिरवणुकीत केलेलें नृत्य विशेष आकर्षण ठरले होते.

शोभायात्राची सांगता येथील महादेवाचे मंदिराजवळ श्री रामाची आरती करून करण्यात आली.या कार्यक्रमासाठी मंगल कलश कार्यक्रमाचे नाशिक जिल्हा कार्यवाह गंगाधर पगार,नांदगाव तालुका कार्यवाह देवराम फुफाणे हे उपस्थित होते,त्यांनी मंगल कलश अभियान बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.वरील गावातील सुमारे दहा हजार पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते,याप्रसंगी सन १९९२ मध्ये बोलठाण येथील शिक्षक राजेंद्र मोरे यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या कारसेवेत प्रभावित होऊन सहभागी झाले होते ते घाटमाथ्यावरील एकमेव व्यक्ती असल्याने त्यांचा याप्रसंगी शाॅल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम लोक वर्गणीतून करण्यात आला त्यात अनेक मुस्लिम बांधवांनी देखील देणगी दिली

व कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील ज्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा जानार त्या सर्व मार्गावर पाणी टाकून रांगोळी काढण्यात आली होती,या शोभायात्रेत सर्व समाजातील तरुण तरुणी, महिला व पुरुषांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या डोक्यावर भगव्या रंगाच्या टोप्या घातल्या होत्या. यासाठी गावातील तरुण मंडळी आणि महिलांनी सकल हिंदू समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.