ताज्या घडामोडी

मनमाडला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

मनमाड ता.२५ शहरात उभारण्यात आलेल्या साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण रविवारी (ता.२४) आमदारआण्णा सुहास कांदे,व समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या वंशजांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडले.

मनमाड-येवला रोडवर इंदिरा गांधी शॉपिंग सेंटरसमोर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले आहे.रविवारी या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सूनबाई सावित्री साठे, नातू सचिन साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या स्मारकाचे काम आमदार सुहास आण्णा. कांदे यांच्या प्रयत्नातून पूर्ण होऊ शकले,असे उपस्थितीत मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान,माजी आमदार राजेंद्र देशमुख,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र अहिरे,साईनाथ गिडगे,योगेश पाटील,नितीन पांडे,सरपंच राजेंद्र पवार,स्वाती मगर,सुनील हांडगे,नारायण पवार,मुख्याधिकारी शेषराव चौधरी,तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे,पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, अल्ताफ खान,गंगादादा त्रिभुवन,राजेंद्र भाबड,सचिन संघवी,अमजद पठाण,अमीन पटेल,इरफान मोमीन आदी मंचावर उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.