ताज्या घडामोडी
उत्तर महाराष्ट्रात आज विजांसह पाऊस
गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नाशिक ता. ७ : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे थंडी ओसरली असून सोमवारी (ता.८) उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात मात्र थंडी ओसरली असून,धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी (ता.८) उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे येथे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.