ताज्या घडामोडी

पत्रकार व पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू :- पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी

नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.०७ वर्षभरातील ३६५ दिवस हे पत्रकार दिन आहे
देशाच्या वाटचालीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे,आपल्याला मूळे देशातील व परिसरातील घडामोडी सर्वसामान्य जनतेला कळतात आपल्याला मार्फत आलेल्या सूचना आम्ही नक्कीच स्विकारू पत्रकारांच्या विविध सूचनांवर नेहमीच मी सकारात्मक भूमिका घेत आहे व भविष्यात ही घेईल,असे प्रतिपादन नांदगाव चे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी केले नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये “पत्रकार दिनी “तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाम आयोजन करण्यात आला होता

संपूर्ण राज्यभर दर्पण दिन शनिवारी (ता.०६ रोजी )साजरा केला गेला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.राष्ट्रीय पत्रकार दिनी नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील व शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश शेळके,जेष्ठ पत्रकार मारुतीराव जगधने,महेंद्र पगार,दैनिक सकाळचे बाबासाहेब कदम, दैनिक लोकमत चे चंद्रकांत भालेराव,संजय मोरे,दैनिक आवाज चे संपादक भगवान सोनवणे,अनिल धामणे,अनिल आव्हाड,सोमनाथ घोंगणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकार हा अडीअडचणी मध्ये बातमीचे वार्तांकन करत असतो,पत्रकार हा पोलीस मित्र म्हणूनही काम करत असतो‘अनेक दुर्लक्षित घटना या पत्रकारमुळे उजेडात येत असतात,नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या घटनेची माहिती पत्रकारांना सुलभतेने मिळण्यासाठी पोलिस स्टेशन व पत्रकार यांचा व्हॅट्सप ग्रुप तयार करून या ग्रुपवर दररोज पोलीस ठाण्यात दाखल घटनेची महिती देण्याची मागणी करण्यात आली.

पत्रकार दिनानिमित्त पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी व सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या
हस्ते उपस्थितीत सर्व पत्रकार बांधवांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

शेवटी चहा व नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक प्रितम चोधरी,सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे,गोपनिय शाखेचे अंमबलदार दत्ता सोनवणे,श्री तांदळकर,श्री .शेरेकर,कॉन्स्टेबल किरण जाधव,आदी पोलीस कर्मचारी नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश शेळके,आदीसह तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

सुत्रसंचालन पत्रकार सचिन बैरागी यांनी तर आभार सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी केले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.