ताज्या घडामोडी

नांदगावला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

तालुक्यात पत्रकार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.०६ येथील शिवनेरी विश्रामगृहात आज मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून “पत्रकार दिन” अर्थात “दर्पण दिन” साजरा करण्यात आला.
.आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार सुरेश आप्पा शेळके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि आज मराठी पत्रकार दिन आहे.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८८२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते.त्यामुळे, आजचा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राद्वारे देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती.बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ मध्ये कोकणातील पोंभुर्ले या गावात एका सामान्य कुटुंबात झाला होता.बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनमान अवघ्या ३४ वर्षांचे होते. मात्र,त्यांच्या कामाची पद्धत,त्यांच्या विचारांचा ठेवा आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.याचा आदर्श ठेवून आपण सर्वांनी काम केले पाहिजे असे सांगितले

यावेळी नांदगाव दुनिया चे संपादक मोहम्मद नवाब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले

यावेळी,पत्रकार मोहम्मद नवाब शेख,चंद्रकांत भालेराव,सचिन बैरागी,महेंद्र पगार,किरण काळे,हेमराज वाघ,ईश्वर जाधव,अनिल धामणे,महेश पेवाल आदी पत्रकार उपस्थित होते.उपस्थितांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले व अभिवादन केले.यावेळी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाबासाहेब कदम यांनी केले

फोटो ओळ –
नांदगाव येथे पत्रकार दिनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त अभिवादन करताना पत्रकार बांधव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.