ताज्या घडामोडी

नांदगाव ला भाजपा च्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या शिबिराचा शुभारंभ

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या शिबिराचे उद्घाटन शहरातील शनी मंदिर गार्डन जवळील सानप ड्रायफ्रूट येथे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे,शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर तथा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत या योजनेद्वारे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या शिबिराचे आयोजन शहरात करण्यात आले असून शनी मंदिर गार्डन जवळील सानप ड्रायफ्रूट येथे भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे,शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाबाजी शिरसाठ,अन्नपूर्णा जोशी,ॲड. मनीषा पाटील,तारा शर्मा,सतिष शिंदे,बळवंत शिंदे,मनोज शर्मा,राजेंद्र गांगुर्डे,दिनेश दिंडे,सुरेश कुमावत,अण्णा काळे,धनराज मंडलीक, शंकर वाघमोडे,रविंद्र सानप,अमोल चव्हाण,धम्मवेदी बनकर आदी उपस्थित होते. यावेळी नाव नोंदणीचा शुभारंभ करण्यात येवून नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस संजय सानप यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.