ताज्या घडामोडी

ट्रक-टँकर चालकांचा संप,पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती,टाकी फुल्ल करण्यासाठी पेट्रोल पंपावर झुंबड

चारही कंपनीचे जवळपास दोन हजार पेक्षा जास्त टँकर संपावर,

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृत्तसेवा

नाशिक ता.०२ – राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही,या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे.केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यतातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक-टँकर चालकांनी संप सुरू केला आहे.यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही,या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे.ट्रक चालकांच्या आंदोलनाचा सोमवारी सायंकाळपासून परिणाम दिसू लागला आहे असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्र सरकारने वाहनचालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक,टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये संतापाची लाट उसळली असून,हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत मनमाडच्या पानेवाडी,नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडेन गॅस कंपनीतुन इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे दोन हजार पेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी सोमवार पासून काम बंद आंदोलन सुरु केले असून.हा कायदा जाचक आहे हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी संपकऱ्यांनी केली आहे.

या संपामुळे मनमाडच्या ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातुन राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेलसह गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाल्याने नाशिक,धुळे, जळगाव,नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर,जालना,बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये संपाचा परिणाम आज (मंगळवार) दिसून येण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाने केलेल्या नवीन कायद्यात काय आहे तरतूद,
– केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता २०२३ कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्यास १० वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.या कायद्यामुळे देशभरातील ट्रक,टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये असंतोष निर्माण झाला असून,हा कायदा अति कठोर आणि अन्यायकारक आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.