ताज्या घडामोडी

वाघोबा यात्रेच्या आखाड्यात कोल्हापूरचा मल्ल अमित पाटील विजयी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

अरुण हिंगमिरे –

जातेगांव ता.०३० बोलठाण येथे सालाबादप्रमाणे यंदाही बुधवार ता..२६ रोजी श्री दत्त जयंती सुरुवात झालेल्या वाघोबा यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी दि.२९ रोजी दुपारी एक वाजता जंगी कुस्त्यांच्या आखाड्याची सुरुवात झाली,

महाराष्ट्रातील नामांकित मल्लांनी येथे आले होते.यामध्ये तीस किलो वजन गटाच्या मल्ला पासून सुरुवात झाली. पन्नास पेक्षा अधिक कुस्त्या झाल्या,या सर्व कुस्तीगीरांना विविध लहान मोठे भांडे व रोख रक्कम देण्यात आली.शेवटची सर्वात महत्वाची कुस्ती जंगी कुस्त्यांच्या जंगी कुस्त्यांच्या कोल्हापूर येथील मल्ल अमित पाटील आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रंगारी देवगाव येथील करण रजपूत यांच्यामध्ये झाली. यामध्ये अमित पाटील हा विजयी झाला,

त्यांस पंधरा हजार रुपये रोख आणि चांदीचे स्मृतिचिन्ह तसेच उप विजेता करण रजपूत यांस सहा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह नांदगावचे नगराध्यक्ष राजेश (बबिकाका) कवडे, माजी आमदार संजय पवार, पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव आहेर,जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पवार,बाजार समितीचे सभापती बंडू पाटील,राजेंद्र देशमुख,संजय आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय निकम,यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र रिंढे,मनोज रिंढे रफिक भाई,पठाण अनिल तात्या रिंढे,विश्नु बारवकर,प्रल्हाद रिंढे आणि मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

या यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांना दररोज वेगवेगळ्या तमाशा कलावंतांनी मनोरंजन करुन मने जिंकली तसेच छत्रपती संभाजी नगर नाशिक,जळगाव धुळे नगर जिल्ह्यातील खेळनी,रहाट पाळने,भांडे, कपडे,बेंटेक्स ज्वेलरी,चप्पल,विविध खाद्यपदार्थ इत्यादी शेकडो व्यवसायिक आले होते.त्यांचा व्यवसाय चांगला झाला असल्याचे यावेळी व्यवसाय करणाऱ्यांनी सांगितले.तर यात्रेच्या निमित्ताने चार दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली असून आणखी तीन दिवस यात्रा सुरू राहणार असल्याचे सरपंच वाल्मिक गायकवाड यांनी सांगितले.सहा दिवस सुरू असलेल्या या उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे पोलिस हवालदार भास्कर बस्ते,हंसराज तळवाडकर,पोलिस शिपाई योगेश मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.