ताज्या घडामोडी

मेहनत,चिकाटीवर नांदगाव च्या गौरव कदम ची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

बाबासाहेब कदम
बाणगाव बुद्रुक ता.३० जिद्द,मेहनत,चिकाटी असेल,तर यश निश्‍चित मिळते.दुष्काळग्रस्त नांदगांव तालुक्यातील नांदगांव शहरातील असलेल्या हमालवाडा भागातील दूरसंचार विभागात काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने त्याचे कौतुक सगळीकडे होत आहे.

राज्यातील पोलीस उपनिरीक्षक भरतीची पूर्व परीक्षा २०२१ ला तर मुख्य परीक्षा २०२२ ला झाली होती.निकाल गुरुवारी ता.२८ रोजी जाहीर झाली.त्यात नांदगाव शहरातील हमालवाडा येथील गौरव सुरेश कदम यांनी घवघवीत यश संपादन केले.गौरवने २०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले आहे.कुटुंबात पहिलाच पोलीस अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.गौरव चे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्य प्राथमिक शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण येथील व्ही.जे स्कूलमध्ये त्यांनी पूर्ण केले.महाविद्यालयीन शिक्षण नांदगावच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पूर्ण केले नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते

पदवीसाठी नाशिक येथे प्रवेश घेतला.महाविद्यालयीन शिक्षण घेत सायन्स विषयात पदवी त्यांनी घेतली.त्यानंतर बाहेर काम करत त्यांनी कोणताही क्‍लास न लावता दिवसाकाठी पाच ते सहा तास रविवारी संपूर्ण दिवसभर मुद्देसूद अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यशाला गवसणी घातली.वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन गौरवने सातत्याने अभ्यास करून आज पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.त्याचे यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.नांदगांव येथील दूरसंचार विभागात अल्पमजुरीवर काम करणाऱ्या सुरेश गणपत कदम यांचे ते पुत्र आहेत.आई गृहणी तर मोठा भाऊ विकी कदम फोटोग्राफर आहे.दुसरा भाऊ योगेश कदम आय.टी कंपनीत इंजिनिअर आहे. गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

गौरवचे हमालवाडा येथील रहिवासी व मल्हारवाडी येथे श्रीराम जनसेवा मोफत वाचनालयात अध्यक्ष रवि सोनवणे यांनी नागरी सत्कार केला यावेळी गौरव यांनी तरुणांना मार्गदर्शन केले यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिक्रिया….
आई-वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहिले होते.ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला लागेल ती मदत केल्याने आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले.मोठा भाऊ व नातेवाईक व मित्रमंडळींनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने माझे स्वप्न साकार होण्यास मदत झाली.जिद्द,मेहनत आणि चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही.

– गौरव कदम, नूतन पोलिस उपनिरीक्षक

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.