ताज्या घडामोडी

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘पडसावल्या’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन…

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता २९ येथील प्रसिद्ध लेखिका,कवयित्री प्रतिभा पवार -खैरनार यांच्या ‘पडसावल्या’ या काव्यसंग्रहाचे रविवारी आजीचे पुस्तकांचे हॉटेल, अक्षरबाग,विंदा करंदीकर वाचनकट्टा,ओझर,दहावा मैल,नाशिक येथे होणार आहे.यावेळी पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते होणा-या प्रकाशन समारंभास प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी प्रा.ऐश्वर्य पाटेकर आहेत आणि यावेळी कवी राजेंद्र दिघे,लेखक रावसाहेब जाधव,कवी अमोल चिने,अक्षरबंधचे प्रविण जोंधळे,लेखक सप्तर्षी माळी,कवी सागर जाधव आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक सुरेश खैरनार यांनी दिली.पुणे येथील ज्ञान सूर्य या प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.प्रतिभा खैरनार यांचे यापूर्वी’तू मृगजळ जणू’कवितासंग्रह व ‘बाभूळफूल’कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.दोन्ही पुस्तकांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.