ताज्या घडामोडी

जातेगावला शिवपुराण कथेची सांगता

आकरा महिने सुरू होती शिवपुराण कथा

गर्जा महाराष्ट्र24 वृत्तसेवा

अरुण हिंगमिरे

नांदगाव ता.२८ तालुक्यातील जातेगांव येथे २७ जानेवारी रोजी सुरु झालेल्या शिवपुराण ग्रंथ पारायणाची गुरुवारी ता..२८ डिसेंबर रोजी विधिवत पूजा आराधना करून व शिवपुराण या कथेचे दोन भाग होते, त्यांची श्रीराम मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशाच्या गजरात आणि भजनाच्या दुमदूमत्या स्वरात नगर प्रदक्षिणा घालून महादेव मंदिर येथे पुजा आणि आरती करून सांगता करण्यात आली,

याप्रसंगी उपस्थित महिलांनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतले होते. या नगरप्रदक्षिणा वेळी हर हर महादेव,ओम नमः शिवाय चा जयजयकार करण्यात आला.

या दोन्ही ग्रंथांचे ऐकुन ४६५ अध्याय होते. त्याचे वाचन श्रीराम मंदिराच्या सभामंडपात दिवस दररोज सायंकाळी ९ वाजेपासून १० वाजेपर्यंत करण्यात आले होते.हि कथा ऐकण्यासाठी गावातील शेकडो महिला स्रोत्या नियमित येत असत.या हिंदी भाषेतील ग्रंथाचे वाचन ह.भ.प विठ्ठल पगारे यांनी करून दररोज उपस्थित स्त्रोत्यांना मराठीतून समजावून सांगितला. आकरा महिने शिवपुराण या महाकाय कथेचे आयोजन येथील श्रीराम मंदिर महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. कथेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने सुमारे एक हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.पंचक्रोशीत येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आयोजित आकरा महिने या प्रदीर्घ काळ कथेची सर्वत्र कौतुक होत आहे.गावातील गोरगरीब महिला भाविकांना पंडित प्रदिपजी मिश्रा यांच्या ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी जाऊन शकलेल्या महिलांसाठी विशेष करून कथेचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीराम मंदिर महिला मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.