ताज्या घडामोडी

बोलठाण येथे दत्त जयंती निमित्त वार्षिक वाघोबा यात्रोत्सवास प्रारंभ

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा
अरुण हिंगमीरे –
नांदगाव ता.२८ तालुक्यातील बोलठाण येथे मंगळवार (ता.२६ )पासून सालाबादप्रमाणे दत्त जयंती निमित्त वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजित करण्यात येते, पंचक्रोशीतील सर्वात मोठी व आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेत तालुक्यातील व शेजारील,चाळीसगाव,कन्नड आणी वैजापुर भाविक तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात.या यात्रेस वाघोबाची यात्रा या नावाने ओळखले जाते,हा यात्रोत्सव हिंदू व मुस्लिम बांधवांचे एकात्मतेचे प्रतीक आहे.

याची एक दंतकथा आहे.साधारण दोनशे ते अडिचशे वर्षापूर्वी युध्द, लुटमार,हिंसा,चोरी हा प्रकार नित्याचा होता,जंगली प्राण्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला होता.मानवी संस्कृती माता ढाय मोकळून रडर होती.सर्व असाहाय्य झालेले होते.अश्या परिस्थितीत त्यावेळी दंडाकारंण्यात वसलेल्या बोलठाण येथे हटयोगी,कर्मयोगी रिध्दी,सीध्दी प्राप्त योगी वैराग्याचे महामेरु संत माधवगिरी महाराज यांचे आगमन झाले.आणी येथील नागरिकांना दिलासा मिळाला ते दररोज सायंकाळी किर्तन प्रवचनाद्वारे नागरीकांच्या मनातील भिती तसेच अज्ञानपना आणी अंधश्रद्धा दुर करत असत,नागरीकांना अंनायाविरुध्द लढण्यासाठी आपले शरीर सुदृढ असावे.म्हणून त्यांनी त्याकाळी तरुणांना व्यायाम,कुस्ती शत्र चालविणे ईत्यादी शिकवत असे.स्वतः सीध्द पुरुष असल्याने ते विद्येच्या जोरावर अचानकच अदृश्य होत असे किंवा त्यांच्या ईच्छेनुसार कुठल्याही पशु किंवा प्राण्याचे रुप घेत असत.असेच एकेदिवशी किर्तन सुरु असतांना त्यांनी ऊपस्थीतांना कोणी व्याघ्ररुप धारन करण्यास इच्छुक आहे का ?असा प्रश्न केला आणी किर्तनासाठी जमलेले भाविक अचंबित झाले.तो दिवस होता मार्गशीर्ष पोर्णिमा दत्त जयंतीचा सर्वजन एकमेकांकडे पहावयास लागले. कोणीच होकार देत नाही,असे पाहून महाराजांनी जमिनीवरील पाच खडे उचलुन मंत्रोच्चार करुन ते खडे उपस्थित असलेल्या भाविकांना दिले आणी त्यांना सांगितले की,मी वाघाचे रुप धारण करतो मी वाघाचे रुप घेतल्यानंतर तुम्ही त्याचे दर्शन घ्यावे जेणेकरून तुमच्या मनात असलेली भिती नाहिशी होईल.व तुम्ही अंनायाविरुध्द लढण्यासाठी परीपक्व व्हाल,परंतु लक्षात असु द्या मी मंत्रोच्चार करुन दिलेले हे पाच खडे माझ्याकडे (वाघाच्या दिशेने भिरकवा) त्यातील एक ही खडा मला लागला तरच मी पुन्हा मनुष्य रुपात प्रकट होईल. अन्यथा मी पुन्हा मनुष्य रुपात येऊ शकनार नाही.असे सांगताच ते वाघाच्या रुपात प्रकट झाले. उपस्थित नागरिक भयभीत झाले सैरावैरा पळु लागले. त्या गडबडीत महाराजांनी मंत्रोच्चार करुन दिलेले खडे हातातुन पडले गेले. महाराज वाघाच्या रुपात एकाच जागी ऊभे होते.परंतु धावपळीत हातातून पडलेले खडे सापडत नाही.हे पाहून ते त्यावेळी असलेल्या घनदाट जंगलात निघून गेले.तेव्हा पासून येथे दत्त जयंतीनिमित्त वाघोबाचा यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो.

येथे नागरिकांनी श्रमदाणातुन आणी लोकवर्गणीतून वाघोबा मंदिराचे बांधकाम केले असुन मंदिरात वाघाची मुर्ती आहे.येथील आणी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रध्देने मंदिरात जाऊन वाघोबाचे दर्शन घेतात. या मंदिराची देखभाल मंदिर देवस्थान ट्रष्ट करत असून मंदिर परिसरात असलेले मालकिच्या जागेत व्यापारी संकुलाचे बांधकाम केलेले आहे. त्यातुन मिळनार्या उत्पन्नातुन मंदिराची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. या यात्रेच्या निमित्ताने वाघोबा महाराज व श्री दत्त महाराज या दोन्ही मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करुन विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेले आहे श्री दत्तात्रेय व वाघोबा यांच्या मुर्तींची भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,या निमित्ताने भजनाच्या निनादात व ढोलताशांच्या गजरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, वाघोबा महाराज की जय च्या घोषणा देत मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही आहे.शुक्रवारी ता.२९ डिसेंबर रोजी जंगिकुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आले आहे या मध्ये शेजारील औरंगाबाद,जळगाव,व नाशिक जिल्ह्य़ातील तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या नामवंत मल्ल सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात बक्षिसे मिळवितात.यात्रा शांतता पुर्ण व आनंदी पार पडण्यासाठी यात्रा उत्सव कमिटी अध्यक्ष श्री रविंद्र रिंढे,उपाध्यक्ष विश्नु बारवकर, अन्सार मनियार, सदस्य मनोज रिंढे, रफिक भाई पठाण, अनिल रिंढे अनिल सोनवणे,गोरख पवार,विजय साळवे, सरपंच वाल्मिक गायकवाड आणि ग्रामपालीका सदस्य तसेच व इतर मुस्लिम बांधव सदस्य तसेच, दत्त पुर्णांति भजनी मंडळ,व सर्व बोलठाण ग्रामस्थांचा सहभाग असतो.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.