ताज्या घडामोडी

बाणगावला वळणाच्या पुलावरून आयशर ट्रक पलटी

महिनाभरात याच ठिकाणी दुसरा अपघात : बांधकाम विभागाचे दुर्लक्षमुळे अपघाताची मालिका सुरुच

गर्जा महाराष्ट्र वृत्तसेवा न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.२४ महिनाभरातच दुसऱ्यांदा
नांदगाव – येवला रस्त्यावर बाणगाव गावाजवळ वळणाच्या पुलावरून पेरू घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघातात झाला आहे यात वाहन चालक जखमी झाला आहे.

अधिक माहिती अशी की रविवारी ता.२२ रात्री ११ च्या दरम्यान नांदगाव येथून येवला मार्गे पेरू घेऊन जाणार आयशर ट्रक MH 17 BY 4507 बाणगाव बुद्रुक गावाजवळील वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने बाणगंगा नदीवरच्या पुलावरून खाली कोसळला यात सुदैवाने जीवित हानी झाली नसून नशीब बलवत्तर असल्याने वाहन चालक जखमी झाला आहे या अपघातात गाडी चे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे

नांदगाव – येवला रस्त्याचे मजबुती व रुंदीकरण काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे रस्ता रुंद झाला पण पुलांच्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झालेले नसल्याने पुलाच्या बाहेर रस्ता रुंद तर पुलाजवळ रस्त्या अरुंद झालेला आहे या पुलाच्या व वळणाच्या ठिकाणी बांधकाम विभागाच्या वतीने वळण दर्शविणारे बोर्ड लाविले नाही तसे काही पुलावर कठडेच राहिलेले नाही यामुळे वाहनचालकना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होऊन प्रवाशी जखमी होत आहे

तसेच गाव व शाळेजवळ गतिरोधक अथवा पट्टे न मारल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहे यामुळे कायमच अपघात होत असून यात शाळकरी मुले जखमी होत आहे.नांदगांव ते येवला या महामार्गावर गावाजवळ व शाळेजवळ गतिरोधक बसवावे,वळणावर दिशादर्शक बोर्ड लावावे बाणगाव गावाजवळीलअपघात स्थळी पुलाची तुटलेले संरक्षण कंठाडे बसवावे ही मागणीचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी व पत्राद्वारे लेखी मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई का करत नाही या रस्त्यावर अजून अपघात होऊन जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे,असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या समस्येकडे लक्ष न दिल्यास बांधकाम विभागाच्या निषेधार्थ रस्ता रोको करण्याचा इशारा बाणगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रतिक्रिया…

नांदगांव – येवला रस्त्यावर बाणगाव गावाजवळ वळणावरील पुलाचे संरक्षण कठाडे तुटलेले आहे येथे वळण दर्शवणारे बोर्ड नाही वाहन चालकांना वळणाचा अंदाज न आल्याने वाहने सरळ नदीत जातात आम्ही ग्रामपंचायतीच्या व शाळेच्या वतीने गावाजवळ गतिरोधक व दिशादर्शनासाठी बोर्ड लावण्याची तोंडी व लेखी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कडे केली आहे या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले आहे बांधकाम विभागाने तात्काळ पुलाचे संरक्षण कठाडे बसवून रस्त्यावर गतिरोधक बसावे अन्यथा बांधकाम विभागाच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल..

बापुसाहेब कवडे – जेष्ठ नेते नांदगांव

फोटो ओळ

बाणगाव बुद्रुक येथील – नांदगाव – येवला रस्त्यावर बाणगाव बुद्रुक गावाजवळील वळणावर पुलावरून कोसळेलेला आयशर ट्रक

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.