ताज्या घडामोडी

अंगणवाडी सेविकांचा नांदगावला पंचायत समितीकार्यालयावर थाळीनाद मोर्चा

जिल्ह्यात पाच हजार अंगणवाड्या झाल्या मुक्या..

गर्जा महाराष्ट्र24 वृत्तसेवा

बाणगाव बुद्रुक ता.२६ पोलिओ निर्मूलनासह,कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या अंगणवाडी सेविकांनी गेल्या २३ दिवसांपासून आपल्या रास्त मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे,मात्र यावर राज्य सरकारच्या वतीने अजून कुठलीच ठोस कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी (ता.२६) नांदगाव प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीवर थाळी नाद मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.

मोदी सरकार हाय -हाय…..शिंदे सरकार हाय …यासह अनेक घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीचा परिसर दणाणून सोडला होता.यावेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती प्राची पवार यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात अंगणवाडी कर्मचारी सन १९७२ पासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत.भारतीय संविधान च्या कलम ४७ अन्वये त्यांची पदे वैधनिक असल्याची पुष्टी यापूर्वीच सर्वोच्च न्यायाल्याने केली आहे.असे असतानाही शासन मात्र आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सदर अंगणवाडी सेविकांवर दडपशाही चा अवलंब करत असल्याची बाब समोर आली आहे.या दडपशाही विरोधात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी नांदगाव पंचायत समितीवर थाळी नाद मोर्चा काढून निषेध नोंदवला.यावेळी तालुका अध्यक्ष श्रीमती मीराबाई राठोड,उपाध्यक्ष पूनम शिंदे,बिट प्रमुख सौ.मंगल कांदे,वाल्ह्याबाई घुगे,सौ.विजया बोरसे,सौ.भारती आहेर,आदिंसह शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या

फोटो ओळ
नांदगांव :- येथेअंगणवाडी सेविकांचा नांदगावला पंचायत समितीवर थाळी नाद मोर्चा काढत आपल्या मागण्याचे निवेदन प्रकल्प अधिकारी श्रीमती प्राची पवार यांना देताना अंगणवाडी सेविका

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.