ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात साकोरा येथे तरुणाचा खून.

दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा
भगवान हिरे

साकोरा ता. ८ नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे काल रविवारी रात्री वेहळगांव रस्त्याच्या बाजूला साकोरा येथील दिपक रमेश कदम याची पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे राहणार साकोरा यांच्यावरती नांदगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील साकोरा- वेहळगाव रोडवर मुळ डोंगरी फाट्यावर रस्त्याच्या कडेला एक पुरुषाचा मृतदेह असल्याचे ॶॅंब्यूलन्स चालक शांतीनाथ राठोडला दिसल्याने साकोरा येथील काही मित्र तसेच पोलिस पाटील बाबासाहेब बोरसे यांना माहिती दिली.नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे,पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक बहारकर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचत मृतदेहाची ओळख पटवली अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती,उपअधीक्षक सोहेल शेख यांनी घटनास्थळी भेट देत तपास कामी पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना सूचना केल्या.सदर मयत व्यक्ती दिपक रमेश कदम(३०) राहणार साकोरा असे समजले.त्यास पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून संशयित आरोपी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे यांनी दगडाने व लोखंडी रॉड ने डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला असून,सदर मयताचा अपघात झाला आहे.असा बनाव करून वेहळगांव रस्त्याच्या कडेला आणून टाकले होते.याबाबत रविवारी सकाळी मयत दिपक,त्याचा भाऊ भाऊसाहेब,संशयीत आरोपी योगेश व देवाजी यांचेत आर्थिक व्यवहार झाले असल्याचे समजते.तसेच मयत दिपकचे एक वर्षापासून गावातील एका विवाहित महिलेबरोबर संबंध ठेवून संसार करीत होता.त्यामुळे सुरूवातीला अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय बळावला होता.मात्र पोलिसांनी लावलेल्या छड्यात आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचे निष्पन्न झाले.

सदर घटनेत वरील दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अटक करण्यात आले आहे.मयताची पत्नी मनीषा दिपक कदम राहणार साकोरा हिचे फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ७/२०२४भा. द.वी.कलम ३०२,३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.