ताज्या घडामोडी

आशा, गटप्रवर्तक यांचा १२ जानेवारी पासुन पुन्हा बेमुदत संप

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

मनमाड : आरोग्य विभागातील आशा व गटप्रवर्तक कर्मचारी महाराष्ट्रात पुन्हा बेमुदत संपावर जात आहे. १८ ऑक्टोबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ या २३ दिवसाच्या संप काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या सोबत सिटू युनियन चे नेते डॉ.डि.एल.कराड व कृती समितीचे पदाधिकारी बरोबर झालेल्या मिटिंग मध्ये आशा यांना ७ हजार रुपये तर गटप्रवर्तक यांना दहा हजार रुपये मानधन वाढ २ हजार दिवाळी बोनस संदर्भात मसुदा तयार करण्यात आला. परंतु राज्य सरकारने या संदर्भात जीआर काढला नाही. वारंवार मंत्री यांना या बाबतीत भेटुन देखील शासन निर्णय काढण्या संदर्भात उदासीनता दाखवत आहे यामुळे महाराष्ट्रातील ७२ हजार आशा व ३६०० गटप्रवर्तक यांच्या मध्ये संतापाची लाट उसळली आहे.राज्य सरकारने जर ११ जानेवारी पर्यंत शासन निर्णय काढला नाही तर १२ जानेवारी पासून पुन्हा बेमुदत संपावर जातील याची दखल राज्य सरकारने घ्यावी असे पत्र मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी साहेब याच्या मार्फत राज्य सरकारला देण्यात आले आहे. यावेळी सिटूचे नेते काॅ.रामदास पगारे,आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियन चे जिल्हा सचिव काॅ.विजय दराडे,मनमाड शहर अध्यक्ष मोहिणी मैंद, रत्ना केदारे,रिना ठाकूर,मोहिणी वाघ,भारती बोडखे,सरला वाघमारे, ललिता ठोंबरे,भारती बिडवे,छाया लोंढे,सोनाली माळवतकर,मिना थोरे, वैशाली जगताप,संगिता जाधव यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.