ताज्या घडामोडी

नांदगाव पंचायत समितीचा अभिनव प्रयोग यशस्वी

१५ दिवसात ९ लाख ८ हजार कराची वसुली .

गर्जा महाराष्ट्र 24 न्युजवृत्तसेवा

नांदगाव ता १० थकीत कराची वसूली होत नसल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर होऊन ती कामे ठप्प होत आहेत.ही बाब गांभीर्याने घेत नांदगाव पंचायत समितीने कर वसुलीसाठी केलेला अभिनव प्रयोग यशस्वी होताना दिसून येत आहे.१५ डिसेंबर २०२३ च्या ठरावानंतर तालुक्यात ८८ ग्रामपंचायतीच्या पैकी अर्ज प्राप्त ६४ ग्रामपंचायत मध्ये १५ दिवसात ९ लाख ८ हजार करवसुली झाली आहे.नांदगाव पंचायत समिती प्रशासनाचा वतीने ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढीसाठी शाश्वत व अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

यां अभिनव उपक्रम चा ठराव दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी पारित केला आहे.यां अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून,ग्रामपंचायतीच्या कुठल्याही कराची बाकी नसल्याच्या दाखला असल्याशिवाय,तक्रार अर्ज,वैयक्तिक लाभाचे अर्ज,विविध पंचायत समिती नांदगांव योजनेचे अर्ज हे दाखल करता येणार नसल्याचे स्पष्ट सूचनाफलक पंचायत समितीच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले.या उपक्रमास पंधरा दिवसात चांगलं प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचात पैकी ६४ ग्रामपंचायत मिळून ‘घरपट्टी व पाणीपट्टी अहवाल.०२ जानेवारी २०२३ पर्यंत “घरपट्टी एकूण वसुली ७ लक्ष ४७ हजार २४७ रुपये. तर पाणीपट्टी एकूण वसुली १ लक्ष ६१हजार १४५ रूपये.मिळून एकूण वसुली ९ लक्ष ८ हजार ३९२ रूपये.एवढी झालेली असून.गेल्या वित्त वर्षातील ही विक्रमी वसुली झालेली आहे.नांदगाव पंचायत समितीने घेतलेले निर्णय कठोर असले तरी त्या वसुलीतून नागरिकांनाच मूलभूत सुविधा मिळतील म्हणून तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समितीच्या या निर्णयाप्रती समाधान व्यक्त केलेले आहे.

===============
प्रतिक्रिया.***

बहुतांश नागरिकांकडून ग्रामपंचायत करपट्टी भरण्यास टाळाटाळ होत असते.यामुळे ग्रामपंचायततिचे विकास कामांना अडचणी येत असते,म्हणून हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.अशा ऊपक्रमाने तालुक्यातील ग्रामपंचायत स्वऊत्पन्नाने स्वयंपूर्ण होतील अशी अपेक्षा आहे .

संदीप दळवी :- प्रभारी गटविकास अधिकारी नांदगाव

=============
नांदगाव पंचायत समितीचा अभिनव उपक्रम चांगला असून,याचा फायदा कर वसुलीसाठी होत आहे.

राजाभाऊ पवार – सरपंच नागापूर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.