ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचे वर्चस्व

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.०१० नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेनबो इंटरनॅशनल स्कूल च्या संयुक्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचे वर्चस्व.गाजवले आहे

७ जानेवारी ला नांदगाव मध्ये नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्ष सरिता बागुल लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका,अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी क्रिडा शिक्षिका मयुरी क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून पोखरी गावचे प्रतिष्ठित शेतकरी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब बागुल,क्रीडा शिक्षक बाळासाहेब आहेर स्कुल कमिटीचे उपाध्यक्ष बाबासाहेब कदम,नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्ष सौ सरिता बागुल,लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल सौ अनुराधा खांडेकर,रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल स्मिता सूर्यवंशी हे होते.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून ३०० च्यावर स्पर्धक सहभागी झाले होते.सर्वप्रथम लेझीमच्या तालात सर्व,प्रमुख पाहुण्यांचे तसेच जिल्हाभरातील आलेले सर्व कोचेस,त्यांचे स्पर्धक यांचे स्वागत करण्यात आले.या स्वागतामध्ये लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साडी ड्रील सादर केले आणि रेम्बो इंटरनॅशनल सीबीएससी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी विविध पिरॅमिड सादर करून सर्वांचे स्वागत केले. यानंतर भव्य अशा शाळेच्या प्रांगणात स्पर्धेला सुरुवात झाली.प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुण दाखवत स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत होते.

या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक।रेंनबो इंटरनॅशनल सीबीएससी स्कूल नांदगाव या संघाला मिळाले.द्वितीय पारितोषिक मिळणारी दोन संघ होते त्यापैकी लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव हा एक संघ आणि एक्सट्रिम कराटे अकॅडमी संघ मालेगाव तृतीय पारितोषिक साहिल फिटनेस अकॅडमी नाशिक यांनी पटकावले.चतुर्थ पारितोषिक एकलव्य कराटे अकॅडमी नाशिक यांनी पटकावले.प्रत्येक जिंकणाऱ्या संघाला जर्सी आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेमध्ये प्रत्येक जिंकणाऱ्या स्पर्धकाला पदक व प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.प्रथम स्थानाला सुवर्णपदक द्वितीय स्थानाला रौप्य पदक आणि तृतीय स्थानाला कांस्य पदक देउन गौरविण्यात आले.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याने रेंनबो इंटरनॅशनल सी बी एस सी च्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करीत नृत्य केले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या चिमुकल्यांचे आमदार सुहास आण्णा कांदे,समाजसेविका अंजुमताई कांदे,नमन शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्याय.सरिता बागुल लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल अनुराधा खांडेकर,रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल स्मिता सूर्यवंशी यांनी अभिनंदन करत कोतुक केले आहे.

ही जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शाळेचे संचालक,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली.नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी दिवसभरात स्पर्धेत आलेल्या सर्वांसाठी चहा,पाणी,नाश्ता आणि जेवनाचे आयोजन केलेले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अनिता जगधने आणि दिपाली भांगे यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.