ताज्या घडामोडी

१६ आमदार अपात्र नाही : नांदगावला शिवसेनेतर्फे फटाके फोडत जल्लोष

आमदारांच्या अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ऐतिहासिक निकाल

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृत्तसेवा

नांदगाव, ता. १०:अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील शिवसेना आमदारांच्या अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी ऐतिहासिक निकाल दिला.शिंदे अथवा ठाकरे गटापैकी कोणालाच अपात्र ठरविण्यात आलेले नसले तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट हा ‘मूळ शिवसेना’ असल्याचा निर्वाळा देत त्यांनी राज्यातील राजकीय अस्थैर्य संपुष्टात आणले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष अॅड. राहल नार्वेकर यांनी दिल्यानंतर बुधवारी (ता.१०) नांदगाव येथे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला,

बाजार समितीच्या प्रागंणात गिरणा धरणामधून शहरात स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अभिनेते क्रांती नाना मळेगावकर आणि बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांच्या ‘न्यू होम
मिनिस्टरचा’ कार्यक्रम ऐन बहरात असताना निकालाचे वृत्त आले. यानंतर शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थितीत शिवसैनिकांनी मग एकच जल्लोष केला.

कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थितीत शेकडो महिला व कार्यकत्यांनी आमदार सुहासआण्णा कांदे,सौ अंजुमताई कांदे यांनी पेढे भरवीत आपला आनंद साजरा केला.आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचे आपण स्वागत करतो अशी प्रतिक्रिया आमदार कांदे यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.