ताज्या घडामोडी

नांदगावला न्यू होममिनिस्टरला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांचा विविध क्रीडा स्पर्धांत उत्साहित सहभाग मोठ्या बक्षिसांची लयलूट

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.०१२ गिरणा धरणामधून नांदगाव शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित सुप्रसिद्ध सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका मळेगावकर यांच्या न्यू होममिनिस्टर कार्यक्रमाला बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

शहराच्या विविध भागातून १२ जानेवारीपर्यत कार्यक्रम होत आहे. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सौ.अंजुमताई कांदे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या कार्यक्रमाला शहरातील भगिनींची तुफान गर्दी उसळली आहे.उखाणे,फुगे फोडणे याचसोबत वेगवेगळ्या स्पर्धात सहभागी होणाऱ्या महिलांमध्ये जेष्ठ वृद्ध महिलांचा प्रतिसादही लक्षणीय आहे.

अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर यांच्या न्यू होममिनिस्टर कार्यक्रमाला रंगत आली आहे. सौ.अंजुमताई कांदे यांनीही नृत्याच्या विविध छटा दाखवीत आपला सहभाग नोंदविला.

गिरणा धरणामधून शहरासाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेला चालना मिळाली असून या योजनेच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खेळ पैठणीचा,सन्मान महिलांचा,स्वागत गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे या विशेष अशा चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आमदार सुहासआण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांनी केले आहे.

मकरसंक्रातीच्या पूर्वीच शहरातील महिलांसाठी महत्वाकांक्षी नळयोजनेची भेट म्हणून देखील शहरातील भगिनीवर्गान स्वागत केले आहे. गप्पा गोष्टी,रंजक खेळ,हिंदी मराठी गाण्यासोबत नृत्याविष्कार व गावरान कॉमेडी अशा पद्धतीने फुलत जाणाऱ्या कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धकांमधून विजेत्या महिलांसाठी प्रथम पारितोषिक फ्रिज,द्वितीय एलईडी टिव्ही,तृतीय मिक्सर, चतुर्थ किचन सेट,व उत्तेजनार्थ व्हीआयपी ट्रॉली बॅग यासह पैठणी साड्यांच्या बक्षिसांची रेलचेल आहे.

बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमात आपापल्या क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल विशेष महिला पुरस्काराने सन्मानित या करण्यात आले. स्मृतिचिन्ह या प्रमाणपत्र तसेच गॅस शेगडी यावेळेस पुरस्काराच्या स्वरूपात ही देण्यात आली.आमदार सुहासआण्णा कांदे व माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी नव्या नळपाणी पुरवठा योजनेची महिलांना माहिती सांगितली या प्रसंगी
पाणीपुरवठा योजनेची ध्वनिचिञ फीत दाखविण्यात आली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.