ताज्या घडामोडी

,कैलासनगरच्या महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन

सायंकाळपर्यंत पाणी मिळेल या आश्वासनावावर आंदोलन मागे

गर्जा महाराष्ट्र24 न्युजवृत्तसेवा

नांदगाव ता.१४ माणिकपुंज धरणाकडून येणारी जलवाहिनी
मोकळ मळा व ठाकर वस्ती येथे फुटल्याने नांदगाव शहरातील कैलासनगर व सह्याद्री नगर येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.२४ डिसेंबर २०२३ नंतर या भागातील नळांना पाणी आले नसल्याने कैलास नगर येथील रहिवाशी महिलांनी संतप्त होत हंडा मोर्चा काढत रविवारी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले

गिरणा धरणातून मिळणाऱ्या पाण्याच्या आवर्तनानुसार नांदगाव शहराला ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी मिळते.या योजनेची जलवाहिनी मागील आठवड्यात शहरातील मटन मार्केटजवळ फुटल्याने पाण्याला विलंब झाला होता.जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतर येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र, त्यानंतर विजपंपाचे एमसीबी ट्रिप झाल्याने गिरणा धरणातून मिळणारे आवर्तन पुन्हा थांबले.पालिकेच्या मालकीच्या दहेगाव धरणातील पाणी आटल्याने नांदगाव नगरपरिषदेने माणिकपुंज धरणावरील जुनी पाणीयोजना पुन्हा कार्यान्वित केली आहे.५६ खेडी पाणी योजनेच्या आवर्तनास तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्यास माणिकपुंज धरणातून मिळणाऱ्या पाण्याद्वारे शहरवासीयांची तहान भागविली जाते.गुरुवारपासून माणिकपुंज धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर शहरवासीयांना पाणी दिले जात होते.परंतु,शुक्रवारी सायंकाळी या योजनेची जलवाहिनी दोन ठिकाणी फुटल्याने पुरवठा विस्कळीत झाला.यामुळे कैलासनगर मधील रहिवाशीना पाण्यापासून वंचीत राहावे लागलेमुळे येथील महिलांनी व नागरिकांनी संतप्त होत हंडा मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन केले

जो पर्यंत नळाला पाणी येत नाही तो पर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा पवित्रा घेतला यामुळे या रस्त्यावर मोठी टॉफिक जाम झाली होती यावेळी पोलिसांनी आंदोलन कर्त्या महिलांची समजूत घातली ,सायंकाळपर्यंत तुम्हाला पाणी मिळेल असे आश्वासन नगरपालिकेच्या वतीने दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.