ताज्या घडामोडी

नांदगाव ला विकसित भारत यात्रेला उदंड प्रतिसाद

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव,ता १४ केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाकडून आज विकसित भारत संकल्पयात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली विकसित भारत संकल्प यात्रा निमित्ताने केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या यात्रेत नांदगावकरांनी सहभाग नोंदवा असे आवाहन मुख्याधिकारी व प्रशासक विवेक धांडे यांनी केले

होते त्यास नागरिकांचा विशेषतः महिला वर्गाचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यानिमित्ताने आयुष्यमान भारत कार्ड वैयक्तिक स्वयंरोजगार कर्ज महिला बचत गट कर्ज वाटप प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना उज्वला गॅस योजना बँकामार्फत विविध कर्ज योजनाप्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भय निधी मुद्रा योजना स्वच्छ भारत अभियान बाबत लाभार्थीचे प्रबोधन मुख्याधिकारी विवेक धांडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जगताप,महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे शाखाधिकारी जयवंत अमृतकर,जिल्हा उद्योग संघाचे संजय सोमवंशी आदींनी मार्गदर्शन केले

नियमित कर्ज फेड केल्याबद्दल बचत गटांच्या प्रवर्तकांचा सत्कार करण्यात आला सामाजिक सरक्षा विषय अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती कल्याण योजना ,प्रधान मंत्री पंथ विक्रेता निधी योजना उद्योग साठी योजना यसंबंधी उपस्थितांना माहिती देण्यात आली , विश्वकर्मा कारागीर योजना व अन्य विविध योजनेच्या माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप यांनी आयुष्यमन कार्ड बदल माहिती दिली शहरात १४ हजार नागरिकांचा समा उमाविष्ट आहे गोल्डन कार्ड काढून घ्यावे असेआवाहन केले प्रकल्पाधिकारी आनंद महिरे यांनी सूत्रसंचालन केले


फोटो ओळी
नांदगाव:- विकसित भारत संकल्प यात्रेत मुद्रा लोन अंतर्गत महिला बचत गटास तीन लाखाचा धनादेश देतांना मुख्याधिकारी विवेक धांडे,सोबत डॉ संतोष जगताप जयवंत अमृतकर संजय सोमवंशी आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.