ताज्या घडामोडी

शेतीत राबणारा तरुण बनला डी.वाय.एसपी.

निफाड तालुक्यातील तामसवाडीचा आनंद कांदे राज्यसेवेच्या परीक्षेत राज्यात २७ वा

..

-गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृत्तसेवा

निफाड ता.०२२ गेल्या नऊ वर्षांपूर्वीच आई -वडिलांचे क्षत्र हरपलेल्या निफाड तालुक्यातील तामसवाडीच्या आनंद कांदे यांनी मोठ्या भावाला शेती कामात मदत करत राज्य सेवेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याने नांदगाव विधानसभेचे आमदार सुहासआण्णा कांदे यांनी त्यांचा सहृदय सत्कार केला.

आनंद कांदे यांनी प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण त्यांनी गावातच घेतले.आई वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती बिकट बनली.पुढील शिक्षण घेणे अशक्यप्राय होऊन बसले.ही गोष्ट आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या कानावर जाताच,त्यांनी आनंद ला बोलावून घेतले.त्याची जिद्द बघून त्यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी भरीव मदत केली.
आनंद ने पदवीनंतर राज्यसेवा परीक्षा देण्यास सुरुवात केली.तीन प्रयत्नात अपयश आल्यानंतर चौथ्या प्रयत्नात मात्र भरभरून यश मिळाले आहे.त्यांना उपजिल्हाधिकारी व पोलीस उपअधीक्षक या दोन्ही पैकी एक पद निवडणे क्रमप्राप्त असल्याने त्यांनी पोलीस उपअधीक्षक पद च स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे.आमदार सुहासआण्णा कांदे यांनी आनंदला बोलावून घेत त्याचा सत्कार केला.यावेळी बबलू पाटील,डॉ.संजय सांगळे,किशोर लहाने,फरहान दादा,ज्ञानेश्वर कांदे,सागर हिरे,प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.