ताज्या घडामोडी

आक्षेपार्ह पोस्टविरोधात नांदगाव बंदला उस्फुर्त प्रतिसाद

पोस्ट व्हायरल करणारे पोलिसांच्या ताब्यात  अप्पर पोलिस अधीक्षकांचे शांततेचे आवाहन 

गर्जा महाराष्ट्र 24 न्युजवृत्तसेवा

नांदगाव, ता. २५ :सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ आज नांदगावला कडकडीत व शांततेत व बंद पाळण्यात आला नांदगाव पाठोपाठ न्यायडोंगरी बोलठाण जातेगाव याठिकाणी देखील बंद पाळण्यात आला बंद काळात कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार घडला नाही दरम्यान सामाजिक सौहार्द सलोखा राखण्याच्या पोलिसांच्या आवाहनाला दोघाही बाजूने प्रतिसाद मिळाल्याने बंद यशस्वी होण्यास मदत झाली 

याबाबत माहिती अशी  मंगळवारी (ता. २३) एकाने सायंकाळी समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता संतप्त गटाची समजूत घालून त्यांना माघारी पाठविण्यात आले मात्र रात्री  पुन्हा एकाने खोडसाळ मजकूर व्हायरल केल्याने भावना दुखावणारा मजकूर व्हायरल करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाईची ठाम भूमिका घ्यावी यासाठी आज नांदगाव बंदचे आवाहन करण्यात आले या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला भावना दुखावणाऱ्याला अटक करावी तेढ निर्माण करण्याचा हेतू तपासून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज च्या वतीने मोर्चा काढण्यात आला

मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाडचे पोलीस उपाधीक्षक सोहेल शेख पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे मोर्चेकर्यांना सामोरे गेले यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलिसांसमोर मागणीचे निवेदन सादर केले  शहरातील काहींनी धार्मिक भावना दुखाविण्याच्या हेतून वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली याबाबत पोलिसांना भेटून वस्तुस्थिती सांगितल्यावर पोलिसांनी समजूत घातली मात्र त्यानंतरही पुन्हा रात्री पुन्हा तशाच प्रकारची पोस्ट पुन्हा व्हायरल झाल्याने जाणीवपूर्वक तर हा खोडसाळपणा केलं जात नाही ना असा संशय घेण्यास वाव असल्याचे सांगत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी नांदगाव बंद मागील भूमिका मोर्चेकऱ्यांनी मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या पुढ्यात स्पष्ट केली

त्यावर श्री  भारती यांनी   पोस्ट टाकणाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या बाबत संबधीतावर विविध कलाम प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे व पुढील तपास पोलीस करीत आहे आपणांस कडे अजून काही माहिती, पुरावा असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले

दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी दोन्ही बाजूच्या मंडळींना सामाजिक सौहार्द सलोखा राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले 

संजय सानप यांनी सकल हिंदू समाजाच्यावतीने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्या आठ संशयिता विरोधात आपली लेखी  फिर्याद दाखल केली दुपारी तीन वाजता पुन्हा निवेदन देण्यात आले त्यानंतर नांदगाव बंद मागे घेण्यात आला त्यानंतर शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत सुरु झाले 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.