शताब्दी वर्षानिमित्त वसंत व्याख्यानमालेच्या वेबसाईट व युट्युब चॅनेलचे लोकार्पण

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नाशिक ता.०७- नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या वेबसाईट आणि youtube चॅनेल चा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला
नाशिक महसूल विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला वसंत व्याख्यानमालेच्या यूट्यूब चैनल वर सुमारे 400 व्याख्याने उपलब्ध आहेत.या व्याख्यानांमध्ये प्रामुख्याने पद्मश्री पंडित सी आर व्यास,न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी,सुरेंद्र शर्मा,पार्श्वगायक अरुण दाते,प्रख्यात गीतकार जगदीश खेबुडकर,सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर,लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर,डॉ.नीतू मांडके,शाकाहार प्रचारक रतनलाल बाफना, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ,अर्थतज्ञ नरेंद्र जाधव, चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर,अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव,सुप्रसिद्ध पक्षीमित्र मारुती चितमपल्ली,राजेयोगी पंचम सिंग,आध्यात्मीक गुरु प्रल्हाद दादा पै,धनश्रीदीदी तळवलकर,सनदी अधिकारी अरविंद इनामदार,विश्वास नांगरे पाटील,पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर,कृषी तज्ञ टि.हक, पंडित रेणू मुजुमदार,सुप्रसिद्ध पत्रकार विनोद दुवा,सामाजिक कार्यकर्त्या रुबीना पटेल,भारुडकार निरंजन भाकरे,विचारवंत सुधिंद्रु कुलकर्णी,मधुकर भावे अशा अनेक मान्यवरांची व्याख्यान youtube वर उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर वेबसाईटवर गेल्या 99 वर्षात ज्या मान्यवरांची व्याख्याने झाली त्याची तपशीलवार माहिती,त्याचबरोबर या व्याख्यानांचे अनेक दुर्मिळ फोटो वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत.व्याख्यानमालेचा हा ज्ञान यज्ञ सुरू ठेवण्यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे,रावसाहेब वझे इंजिनियर यांच्यासह वेळोवेळी जे जे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले त्यांची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. प्रमुख वक्तांच्या बातम्यांची वृत्तपत्रातील कात्रणे वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्याख्यानमालेला जे दानशूर नागरिक मदत करू इच्छिता त्यांना आपली मदत पोहोचविण्यासाठी कोणकोणते साधने उपलब्ध आहेत याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.वेबसाईट आणि youtube चॅनलच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की,शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मे महिन्यामध्ये जे कार्यक्रम आयोजित केले आहेत ते अजरामर ठरणारे आहेत. या व्याख्यानांची चर्चा पुढची दहा-पंधरा वर्ष श्रोते काढत राहतील असा विश्वास वाटतो.
चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, यूट्यूब चॅनल वर हा जो विचारांचा खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे आहे तो अतिशय दुर्मिळ आहे.जे नागरिक किंवा श्रोते ही व्याख्याने ऐकतील त्यांना मिळणारा आनंद अवर्णनीय असेल.मी स्वतः या व्याख्यानांचा वेळ काढून आनंद घेणार आहे.नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने वेबसाईटला भेट देऊन व्याख्यानांचा आनंद घ्यावा. वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षासाठी नाशिक महानगरपालिका भरघोस अर्थसाहाय्य करेल आणि हा ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी हातभार लावेल.
या कार्यक्रमास उद्योजक सुनील चोपडा,अरुण नेवासकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते मालेच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला. तसेच वेबसाईट तयार करणाऱ्या सौ.भाग्यश्री केंगे,youtube चॅनल तयार करणारे राहुल रोजेकर,रोशन कर्पे,गणेश लोहारे यांचाही सत्कार करण्यात आला.
मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालेचे पदाधिकारी श्री विजय बाबुराव हाके,सौ.उषा नवलनाथ तांबे,प्राचार्य सौ.संगिता राजेंद्र बाफणा,श्री हेमंत नथुजी देवरे,श्री गणेश भोरे,ॲड.हेमंत तुपे,श्री अविनाश हेमराज वाळुंजे,श्री सुनील गायकवाड,ॲड.कांतीलाल तातेड,श्री विजय लक्ष्मण काकड,श्री कृष्णा शहाणे,श्री मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, श्री. अजय निकम,ॲड.अजय तोष्णीवाल यांनी परिश्रम घेतले.
वेबसाईट: www. vvmalanashik.org
आणि
Youtube पेज करिता
www. youtube.com/vvmalanashik2023
येथे संपर्क करावा.
फोटो कॅपशन –
वसंत व्याख्यानमालेच्या युट्युब व वेबसाईटचे लोकार्पण करतांना महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार छायाचित्रात दिसत आहे.