ताज्या घडामोडी

बाणेश्वर देवस्थान प्रती दक्षिण काशी

बाणगावचे जागृत श्री बाणेश्वराचे देवस्थान

महाशिवात्रीनिमित्त विशेष माहिती…

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.०५ श्रीराम अवतारामध्ये मारीच नावाच्या राक्षसाच्या मागे
प्रभु श्रीराम शिकारसाठी धावले,मारीच हा मायावी होता तो सुवर्णमृग होवून पंचवटीत आला होता.त्याचा पाठलाग करीत प्रभू श्री रामचंद्र चांदोरी – चाटोरीमार्गे श्रीक्षेत्र पुणतांबे येथ पर्यंत आले. कायगांव टोक येथे त्यांनी मारीच राक्षसाचा वध केला.त्यानंतर लक्ष्मण तेथे आले.दोघे बंधू नस्तूनपुर येथिल श्रीक्षेत्र शनैश्वराची पूजा करून,बेलेश्वराचे दर्शन घेवून श्री बाणेश्वराच्या प्राचीन देवस्थानाजवळ आले.-

बाणेश्वर देवालया जवळ शरभंग ऋषींचा आश्रम होता.ते बाणेश्वराचे निस्सीम भक्त होते परंतु,त्यांना शारीरिक रोग होता,त्यामुळे त्यांच्या शरीराची दुर्गंधी येई.त्यांना श्रीरामप्रभूचे दर्शन घ्यावयाचे होते;पण त्यांना आपल्या रोगाची लाज वाटली..त्यांनी आपल्या तपोबलाने ते दुःख एका वस्त्रामध्ये बांधून ठेवले व नंतर त्यांनी श्री रामप्रभूचे दर्शन घेतले सर्वज्ञानी श्रीरामाला अंतर्ज्ञानाने सर्व समजले. पूजा आटोपल्यानंतर ऋषींची भेट घेवून प्रभु श्रीराम अगस्ती क्षेत्रावर गेले: शरभंग ऋषींची अवस्था मात्र त्यांना सहन झाली नाही.म्हणून त्यांनी अगस्तीहून तीन बाण मारले. ते बाण बाणेश्वराजवळ आले.त्यापासून तीन कुंड तयार झाले १) रामकुंड, २)सीता, कुंड,३)लक्ष्मण कुंड झाले या कुंडात स्नान केल्यानंतर’शरभंग ऋषीची रोग मुक्तता व भोग मुक्तता झाली अशी श्री गोदावरी महात्थ्य नावाच्या ग्रंथात कथा आलेली आहे.प्रभू श्री रामचंद्रांनी मारलेल्या बाणावरुनच नंदीपात्रास बाणगना म्हणतात.शरभंग ऋषींची समाधी आज ही मंदिराच्या दक्षिण बाजूस आहे तेथे गावकऱ्यांनी समाधी मंदिर बांधण्यात आलेले आहे.

श्रीकृष्ण अवतारमध्ये द्वापारयुगात बाणेश्वर नावाचा राक्षस होवून गेला.ते प्रभू शिवशंकराचा निस्सीम भक्त होवा त्याच्या पूजेचे – ठिकाण म्हणजे बाणेश्वर हे होय.त्याच्या नावावरुनच देवस्थानाचे नाव बाणेश्वर हे पडले. बाणेश्वर देवस्थानाजवळ वसलेल्या तत्कालीन वस्तीस बाणगाव हे नाव प्रचलीत झाले,असे हे पुरातन जागृत स्थान आहे

बाणगाव चे भूमिपुत्र स्व:अण्णासाहेब कवडे हे खासदार असताना काशीचे विख्यात पंडीत नाशिक येथे आले देवदर्शन आटोपून त्यांनी प्रसिध्द व्यक्तीच्या भेटी घेतल्या त्यात त्यानी बाणेश्वर देवस्थान असलेले बाणगाय कुठे आहे,हा प्रश्न केला.तेव्हा त्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी या पडीतांची स्व अण्णासाहेबांशी भेट करुन दिली.तेव्हा त्या पंडीतानी अण्णासाहेबाना बाणेश्वर देवस्थान हे महाग देवस्थान आहे.त्याला दक्षिण काशीही म्हटले आहे तेव्हा त्याची जोपासना करावी हे सांगितले त्या प्रसिध्द पंडीतांनीही येथे येवून बाणेश्वराची पूजा केली.त्यानंतर खासदार स्व अण्णासाहेब कवडे यांनी बाणगावी येवून ग्रामस्थांना या घटनेची कल्पना दिली.यानंतर त्यांनी लोकसहमतीने बाणेश्वर देवस्थानाचा जिणोध्दार केला, असे हे पुरातन महान देवस्थान आहे.

आजही येथे महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावतात, तसेच दिंडी सोहळा घेवून तालुक्यातील व तालुक्याबाहेरील वारकरी दर्शन घेवून व रात्रीचे कीर्तन करतात.रात्रभर जागर करुन महाशिवरात्रीला अन्नदानाचा लाभ घेवून दुसऱ्या दिवशी प्रस्थान करतात.अनेक भाविक या ठिकाणी महाशिवरात्रीला फराळाचे अन्नछत्र घालतात बाराही महिने दूरदूरचे भाविक पुरोहितांना सोबत आणून या क्षेत्राची पूजा करतात त्याचप्रमाणे वर्षभर प्रत्येक एकादशीला बाणेश्वर मंदिरात रात्रभर भजन् करुन द्वादशीच्या सकाळी अन्नदान होते.वर्षभरातील सर्वच धार्मिक उत्सव उदा, गोकुळाष्टमी,रामनवमी,वामन जयंती,दत्तजयंती,तुकाराम बीज़,पारायण सप्ताह इत्यादी या ठिकाणी लोकसभागातून संपन्न होतात.बाणेश्वर येथे वर्षभरात दोन वेळस भव्य यात्रात्सोव होत असतो महाशिवरात्री गुढीपाडवा या दोन महत्वपूर्ण तिथींना यात्रा भरते.यावेळी भाविकांची अलोट गर्दी असते.बाणेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी १० एकर जमीन आहे.त्यातून वर्षभरातील उत्सव व दिवाबत्तीचा खर्च केला जातो

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.