संगीतामुळे माणसाचे मन स्थिर होण्यास मदत : डॉ गणेश चव्हाण
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई संचलित,स्वर साधना संगीत विद्यालय,चाळीसगाव -नांदगावचे पारितोषिक व गुणगौरव सोहळा संपन्न

गर्जा महाराष्ट्र २४न्यूज वृत्सेवा
नांदगाव ता.०४ संगीत माणसाचा अविभाज्य भाग आहे.संगीता शिवाय मनुष्याचे जीवन पुर्ण होत नाही.आजच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्यावतीने संगीताचे ज्ञान मिळत आहे.ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन प्रा.सुरेश नारायणे यांनी केले.
ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई संचलित स्वर साधना संगीत विद्यालय चाळीसगाव -नांदगाव ने स्व.भिकचंद छआजएड विद्यामंदिर येथे आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळयाच्या अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावर संगीत तज्ञ व विषारद श्रीनिवास मोडक,डॉ.गणेश चव्हाण,सौ.रोहिणीताई मोरे,संगीत विद्यालय संचालक श्रीपाद मुळे,राजेंद्र मोरे,सौ.महाले,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी संगीत आणि आरोग्य या विषयावर डॉ.गणेश चव्हाण यांनी सविस्तर सखोल अशी माहिती दिली.संगीतामुळे माणसाचे मन स्थिर होण्यास मदत होते.तसेच संगीतामुळे अनेक आजार बरे होण्यासाठी व मानसिक स्वास्थ्य वाढण्यासाठी मनुष्याला संगीताची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.सुरवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते कलेची देवता नटराज व सरस्वतीचे पूजन केले.स्वागत गीत संगीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी म्हटले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र मोरे यांनी केले.व संगीत शाळेचा आढावा त्यांनी सांगितला.नांदगाव या ग्रामीण भागातील मुलांना यामुळे गायनाचे धडे व संगीतात गोडी लागते असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चौदा मुलांनी संगीत परिक्षेत प्राविण्य मिळविले.त्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी चाळीसगाव येथून आलेल्या महिला भजनी मंडळाने व संगीत साधना करणाऱ्या मुलांनी विविध रागातील गीत सादर करुन प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकले.

यात विशेष करुन,सुंदर ते ध्यान,उभे विटेवरी,हा अभंग,मज फुल ही रुतावे,म्हणा हरी नारायणा,अमऋतआहउन गोड नाम तुझे देवा, अशी बरीच गाणी विविध राग सादर केले.भावगीत,भक्ती गीते, नाट्यगीते, लोकगीते,विविध शास्त्रीय संगीतावर आधारीत गीत गायन वादन झाले. यावेळी चाळीसगाव येथून आलेल्या महिला भजनी मंडळाने देखिल सावर सावर अंबाबाई आणि सावळ्या हरी हे गीत त्यांनी सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळवली.या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन अगदी सुंदर होते. याप्रसंगी अनेक दर्दी रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद मुळे यांनी केले. तर संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया गजानन जोशी यांनी केले.



