ताज्या घडामोडी

बाणगावला ज्ञानेश्वरी कवडे दहावीला प्रथम

जनता विद्यालय बाणगावचा निकाल १०० टक्के

गर्जा महाराष्ट्र २४ न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.२७ मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय,बाणगाव विद्यालयाचा या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावी चा निकाल शंभर टक्के लागला असून या यावर्षीही मुलींनी घवघवीत यश संपादित करत बाजी मारली आहे.

विद्यालयात दहावीत परीक्षेला एकूण प्रविष्ट विद्यार्थी ३७ विद्यार्थी परीक्षा दिली यात सर्वच ३७ विद्यार्थी उतीर्न झाले आहे.यात कु ज्ञानेश्वरी अरूण कवडे ९० टक्के मिळवीत प्रथम क्रमांक मिळवला आहे अक्षदा वाल्मिक साबळे ८८.२० टकके व्दितीय सुप्रिया संदिप गोराडे ८७.६० टक्के तितीय तर राधा नानासाहेब कपाटे ८६.८० टक्के व कृष्णा ज्ञानेश्वर कवडे ८६.४० टक्के मिळवित यश संपादित केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ नेते बापुसाहेब कवडे म.वि.प्र.संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर संस्थेचे पदाधिकारी,नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे,माजी सभापती तेज कवडे शालेय समितीचे अध्यक्ष चांगदेव देवकर, सर्व शालेय समिती सदस्य,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.एस.आर.बोरसे,उपशिक्षक श्री.जे.बी.पवार श्री.पी.डी.शिसोदे श्री.आर.ए.चोळके श्रीमती व्ही.ए.शिंदे श्रीम.व्ही.ए.काळे लिपिक श्री.एस.ए.बोरसे शिपाई श्री.जी.बी आहेर यांनी अभिनंदन करत शुभेच्या दिल्या

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.