ताज्या घडामोडी

येवला – नांदगाव रस्ताचे पुढे डांबरीकरणाचे काम सुरू तर पाठीमागे महाकाय खड्डे..

साईट पट्टीसाठी चक्क काळी मातीचा वापर

गर्जा महाराष्ट्र २४न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.२७ नांदगाव – येवला रस्त्याचे डांबरीकरण काम पुर्ण होण्याच्या आधीच या रस्त्यांवर महाकाय खड्डे पडले आहे तर दुसरीकडे साईट पट्टीसाठी हार्ड मुरूम ऐवजी चक्क काळी मातीचा वापर होत असल्याने या रस्त्याच्या कामात लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरत असल्याची तक्रार होत असून याची सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

नांदगाव – येवला रस्त्याचे मजबुती व रुंदीकरण काम गेल्या तीन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे येवला ते दहेगाव फाटा पर्यंत डांबरीकरण झाले आहे आता दहेगाव फाटा ते नांदगाव शहर सबवे पर्यंत चे डांबरीकरनाचे काम सुरू आहे,डांबरीकरन झालेल्या बाणगावं ते दहेगाव फाटा रस्ता दबला आहे. तर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. असे खड्डे पडलेले दिसत आहेत.सदर खड्डे दिसत नसल्याने वाहनधारकांना अचानक ब्रेक मारावा लागतो त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

काम सुरू असतानाच रस्ता दबत असेल तुटत असेल तर तो रस्ता किती दिवस टिकेल याचाही विचार केला पाहिजे रस्त्याचे काम अजून अपूर्ण आहे. काम सुरू असतानाच रस्त्याला खड्डे पडत असतील तर कामच्या गुंणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काही ठिकाणी एका बाजूची नालीच न केल्याचे दिसत आहे यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी व चिखल रस्त्यांवर येणार आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे

***”
साईट पटरी साठी चक्क काळी मातीचा वापर….

डांबरीकरण झालेल्या दहेगाव फाटा ते बाणगाव पर्यंत रस्त्याचे साईट पट्टी साठी भरावा करण्याचे काम सुरू आहे यात काही ठिकाणी साईट पट्टी कमी रुंदी ची आहे साईड पट्टीवर भरावा साठी हार्ड मुरूम ऐवजी काळी माती वापरली आहे पावसाळ्यात या साईट पटरीवर आल्यास वाहने फसवून आपघात होणारं आहे

रस्ता ठरतोय अपघताचा हॉटस्पॉट….@@@@

रस्ता रुंद झाला पण पुलांच्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झालेले नसल्याने पुलाच्या बाहेर रस्ता रुंद तर पुलाजवळ रस्त्या अरुंद झालेला आहे तसे काही पुलावर कठडेच राहिलेले नाही यामुळे वाहनचालकना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होऊन प्रवाशी जखमी होत आहे तसेच गाव व शाळेजवळ गतिरोधक अथवा पट्टे न मारल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहे यामुळे कायमच अपघात होत असून यात शाळकरी मुले जखमी होत आहे.नांदगांव ते येवला या महामार्गावर गावाजवळ व शाळेजवळ गतिरोधक बाणगाव गावाजवळीलअपघात स्थळी पुलाची तुटलेले संरक्षण कंठाडे बसवावे ही मागणीचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी व पत्राद्वारे लेखी मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई का करत नाही या रस्त्यावर अजून अपघात होऊन जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या समस्येकडे लक्ष न दिल्यास बांधकाम विभागाच्या निषेधार्थ रस्ता रोको करण्याचा इशारा बाणगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

*********

प्रतिक्रिया…

नांदगांव – येवला रस्त्यावर बाणगाव गावाजवळ वळणावरील पुलाचे संरक्षण कठाडे तुटलेले आहे वाहन चालकांना वळणाचा अंदाज न आल्याने वाहने सरळ नदीत जातात आम्ही ग्रामपंचायतीच्या व शाळेच्या वतीने गावाजवळ गतिरोधक बसविण्यासाठी लेखी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कडे केली आहे या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले आहे बांधकाम विभागाने तात्काळ पुलाचे संरक्षण कठाडे बसवून रस्त्यावर गतिरोधक बसावे अन्यथा बांधकाम विभागाच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल..

बापुसाहेब कवडे – जेष्ठ नेते नांदगांव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.